धार्मिक

श्रीगणेश सजावटीत बालगोपालांची नैसर्गिक व घरगुती साधनांचा वापर करून आकर्षक सजावट

आरडगांव | राजेंद्र आढाव : राहुरी तालुक्यातील वांबोरी या गावातील पटारे-पगिरे वस्ती वरील अगदी लहान वयात असलेल्या या मुलांनी घरगुती श्री गणेशाची स्थापना केलीय. अतिशय आगळी वेगळी आणि तीही अगदी झिरो बजेट मध्ये. कौस्तुभ, सिद्धी, वेदिका पगिरे, प्राची, स्नेहा, देवांशी पागिरे हे सर्व बालगोपाल हे पटारे-पगिरे वस्ती वांबोरी ता. राहुरी जिल्हा अहमदनगर येथील आहेत. १० ते १६ वर्ष वयाचे हे बालगोपाल कन्या विद्यालय वांबोरी येथे शिक्षण घेत आहेत.

श्री गणेशाची स्थापना करतांना मुलांनी पेपर रद्दी, नारळाच्या शेंड्या, झाडाची वाळलेली फांदी, टोपले, घमेले, पुष्ठा, हे नैसर्गिक आणि घरगुती साधनांचा वापर करून पैसे खर्च न करता आकर्षक सुंदर सजावट केलीय. गणपतीचे आसन बनवितांना त्यांनी घरगुती वापरात नसलेले टोपल्याचा वापर करत त्याला आतून पांढरा कागद चिटकवला  आणि पोळ्याच्या सणाला वापरलेल्या टाकाऊ नारळाच्या शेंड्यांचा वापर करून गणेशाच्या डोक्यावर कोणताही खर्च न करता शेंड्या जमवुन नारळातून गणपतीचे दर्शन घडवले. सुंदर आणि नैसर्गिक पद्धतीने मुकुट तयार करण्यात आलाय.

कार्डशीट पेपरचा उपयोग माध्यमातून शंकर-पार्वती चे स्केच तयार केले. जसे प्रत्येकाचे आई वडील आपल्या मुलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असतात तसेच यातून हा भाव पेंटिंगद्वारे दाखविण्याचा प्रयत्न केलाय. पेपर रद्दी पासुन गुफा, पाणी पडत असताना चे गोमुख रिकाम्या निकामी डब्यापासुन करत किचन ओट्याचा आणि नळ यांचा आधार घेतला. जीवनात खळखळुन आनंद कसा वाहता असावा त्यासाठी वाहता झरा दाखवला.

तसेच झाडाची वाळलेली फांदी, पुष्टा वापरून केदारनाथ सारख्या ठिकाणी प्रत्येकासाच जाणे जमत नाही त्यासाठी कागदी रद्दी, पुठ्ठ्याचे मंदीर व तुळशीमधील महादेव व नंदी बैल यांच्या दर्शनाचा लाभ घेता. तसेच आपले सर्वाचे आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा किल्ला तयार करून प्रत्येकात स्फुर्ती यावी आणि त्यांना नमस्कार व्हावा हा प्रयत्न देखील केलाय.

सर्व बालगोपाल हे शेतकरी कुटंबातील आहेत. त्यांनी आपले सर्व कामकाज आणि अभ्यास करून देखील उर्वरीत वेळेचा सदुपयोग करून आपली ही अनोखी कला जोपासली आहे. मागील वर्षी देखील त्यांनी एक आगळा वेगळा देखावा सादर केला होता.

पर्यावरणाची हानी होणार नाही याची विशेष काळजी घेत त्यांनी अतिशय आगळी वेगळी आणि नैसर्गिक पद्धतीने मुकुट, मंदिरे, छत्रपती शिवाजी महाराज यांचा किल्ला, गोमुख, आदी बाबींचा समावेश करत आपली घरगुती गणपती बाप्पाची आरस साकारली आहे.

या निमित्ताने घरात आनंदाचे, आणि भक्तिमय वातावरण निर्माण तर झालेच परंतु ज्या कोणी व्यक्तीने सोशल मीडियावर हा देखावा पाहिला, त्या प्रत्येक व्यक्तीने हा देखावा पाहण्यासाठी आवर्जून येऊन या लहानग्यांचे तोंडभरून कौतुक देखील केले. यातून या मुलांना एक शाब्बास्कीची थाप देखील मिळत आहेच. त्याचबरोबर एक नवी प्रेरणा घेऊन पुढील वेळी अजूनही वेगळं करण्याची इच्छा मनाशी बाळगून आहेत.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button