अहमदनगर
पोलीस निरीक्षक जाधव यांची पत्रकार अशोक मंडलिक यांच्या घरी सदिच्छा भेट
राहुरी : येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी नुकतीच राहुरी खुर्द येथील पत्रकार अशोक मंडलिक यांच्या घरी सदिच्छा भेट देऊन पत्रकार मंडलिक यांच्या कुटुंबातील सदस्यांशी मोकळीक गप्पा मारल्या व लहान बालकांना मार्गदर्शन केले. पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी भेट दिल्याने मंडलिक कुटुंबीयांचा आनंद द्विगुणित झाला.