नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी माजी मंत्री तनपुरे यांच्या समोर मांडली कैफियत
ठेकेदाराने पैसे देऊनही भरपाई न मिळाल्याने या घटनेचा शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत केला तीव्र निषेध
राहुरी – ठेकेदाराने पैसे देऊनही ग्रामपंचायत पदाधिकार्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई न दिल्याने शेतकऱ्यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या समोर कैफियत मांडली.
सविस्तर वृत्त असे की, आज दि. 22 रोजी राहुरी नगर पाथर्डी मतदार संघाचे आमदार व माजी मंत्री प्राजक्त प्रसाद तनपुरे हे एका कार्यक्रमासाठी मतदार संघातील सोनगाव, सात्रळ, धानोरे पंचक्रोशीत आले असता सोनगाव धानोरे येथील जलजीवन मिशन अंतर्गत गावासाठी पाणीपुरवठा योजना सुरू असून सोनगाव येथील पाझर तलावातील जागा या योजनेसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
जलजीवन मिशन अंतर्गत साठवण तलाव करण्यासाठी पाझर तलाव फोडल्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी भरपाई न मिळाल्याने माजी मंत्री तनपुरे यांच्या समोर मांडली कैफियत
सुमारे आठ ते दहा महिन्यांपूर्वी झालेल्या पावसाने सदर तलाव पूर्ण पातळीने भरलेला होता. परंतु पाणीपुरवठा साठवण तलावाचे काम लवकर सुरू करण्याच्या नादात संबंधित ठेकेदाराने सदर तलाव फोडल्याने सोनगावसह धानोरे गावातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जाऊन पिकांचे नुकसान झाले होते. त्यावेळी संबंधित ठेकेदाराने भरपाई देण्याचे कबूल केले होते. परंतु भरपाई मिळाली नाही म्हणून शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याने आज याबाबत आमदार तनपूरे यांच्या समोर दोन्ही गावच्या काही शेतकऱ्यांनी कैफियत मांडली.
आमदार तनपुरेंनी ऑन द स्पॉट संबंधित ठेकेदाराला बोलावून घेऊन भरपाई देण्याच्या सूचना दिल्या. यावर त्या ठेकेदाराने सांगितले की, सोनगाव ग्रामपंचायतच्या एका उच्च पदस्थ पदाधिकार्याना मी स्वतः नव्वद हजार व माजी संचालक तथा सदस्याला तीन महिन्यांपूर्वीच एक लाख रुपये दिले आहे. याआधी मला अनेक फोन आले होते, त्यांना मी हे सांगितले होते. याबाबत मी त्यांना विचारणा केली असता त्यांनी शेतकर्याना पैसे दिलेले आहे असे सांगितले. यावेळी आमदार तनपुरेंनी सदर पैसे दिलेल्या पदाधिकारी यांना फोन लावले असता दोघांनीही फोनला प्रतिसाद दिला नाही. परंतु आ तनपुरे यांनी ठेकेदाराला त्यांच्याकडून दिलेले पैसे मागे घेऊन शेतकऱ्यांना देण्याचे सांगितले.
गावातील नेत्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक करणारा प्रकार उघडकीस आणल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला दिल्याने शेतकऱ्यांनी आमदार प्राजक्त तनपुरेंचे आभार मानले. त्याचबरोबर गावात असे जनतेचे सेवक असतील तर गावाचा विकास होण्याऐवजी गाव भकास होईल. गोरगरिबांचे पैसे दाबून ठेवणाऱ्यांना व भ्रष्टाचार करणाऱ्यांना यापुढे जनता माफ करणार नाही, अशी चर्चा उपस्थितांमध्ये रंगली होती.