अहमदनगर

सर्वाधिक ऊस उत्पन्नाबद्दल मुरकुटे यांचा सन्मान

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : अशोक सह. सा‌खर कारखान्याच्या वतीने २०२२ – २०२३ या गळीत हंगामात आडसाली ऊस पिकाचे सर्वाधिक उत्पादन घेतल्याबद्दल ज्ञानेश्वर मुरकुटे यांना अशोक कारखाना वतीने पुरस्कार दिला जाणार आहे. चार एकरात २८९ टन ( एकरी ७२ टन ) उत्पादन टाकळीभान शेतीत घेतलेले आहे. सोमवार दि.२५ सप्टेंबर २०२३ रोजी दु. २ वा. कारखाना सर्वसाधारण सभेत सन्मान चिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. आपले सर्वांचे आशीर्वाद, सहकार्य व प्रेमामुळे करू शकलो हे मी कधीही विसरु शकणार नाही, असे ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी सांगितले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button