ठळक बातम्या

आत्मदहनचा इशारा देताच छावा क्रांतिवीर सेनेचे उपोषण अखेर सुट्टले

राहुरी शहर/अशोक मंडलिक : महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने कृषी विद्यापिठ राहुरी येथील भ्रष्ट अभियंता मिलींद ढोके याचे पद रद्द करण्यासाठी अमरण उपोषणाचा तिसऱ्या दिवशी आत्मदहन करण्याचा इशारा दिला असता विद्यापिठाचे कुलसचिव प्रमोद लहाळे व पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे, राहुरी यांच्या मध्यस्थीने विद्यापीठाच्या ठोस लेखी आश्वासनानंतर प्रदेश कार्याध्यक्ष विश्वनाथ वाघ यांचे गेले 3 दिवसापासून चालु असलेले उपोषण आज संध्याकाळी स्थगित करण्यात आले.
छावा क्रांतिवीर सेना प्रदेश कार्याध्यक्ष विश्वनाथ वाघ यांचे कृषी विद्यापिठ समोर अमरण उपोषण चालू होते. महात्मा फुले कृषी विद्यापिठामध्ये मनमानी पध्दतीने निर्मित उपअभियंता विद्यापीठ पद रद्द करणे व सदरपदी त्यानंतर नियमबाह्यरित्या विद्यापिठ अभियंता पदी मिलींद ढोके यांची पदोन्नतीने झालेली नियुक्ती रद्द करणे. यास जवाबदार दोषींवर कठोर कारवाई करणे तसेच विद्यापिठ अभियंता कार्यालयात मिलींद ढोके कार्यरत झाले पासूनच्या सर्व कामांची चौकशी करून त्यातून केलेल्या गैरव्यवहारातून त्यांनी कमावलेल्या अवैध संपत्तीची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यासाठी दिनांक 15 नोव्हेंबर 2021 रोजी पासून अमरण उपोषण सुरू केले होते व दि. 17 नोव्हेंबर 2021 रोजी पर्यत उपोषण चालु होते.
या उपोषणास सरपंच सेवा संघ अध्यक्ष बाबासाहेब पावसे व छावा क्रांतिवीर सेना शेतकरी आघाडीचे प्रदेश कार्याध्यक्ष गणेश येवले, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजाराम शिंदे, जिल्हा संपर्क प्रमुख विलास पाटणी, जिल्हा कार्याध्यक्ष विठ्ठल भुजाडे, जिल्हा उपाध्यक्ष सागर गोसावी, राहाता तालुका अध्यक्ष करण वाघ, राहुरी तालुका अध्यक्ष युवा गणेश खडांबेकर, अजय वाबळे, अक्षय गिरी, बारकु अंभोरे यासह इतर सहकारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button