क्रीडा

क्रीडा स्पर्धा अध्यक्षपदी प्रशांत होन

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : आरबीएनबी कॉलेज श्रीरामपूर येथे अहमदनगर जिल्हा क्रीडा अधिकारी व श्रीरामपूर क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष 2023/24 या वर्षीच्या क्रीडा स्पर्धा आयोजनासाठी सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती.

या सहविचार सभेत नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी प्रशांत होन केशव गोविंद विद्यालय बेलापूर यांची निवड झाली. उपाध्यक्ष विष्णु राऊत ( जा.वा. आदिक विद्यालय अशोकनगर), सचिव अजय आव्हाड ( विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल श्रीरामपूर), सहसचिव नितीन ( बलराज संत तेरेजा हायस्कूल हरेगाव), क्रीडा शिक्षक समन्वयक म्हणून अजित कदम (डी.डी.काचोळे विद्यालय श्रीरामपूर) आदींच्या निवडी करण्यात आल्या.

वरील सर्व निवडी माजी अध्यक्ष कुंडलिकराव शिरोळे यांनी सर्वानुमते जाहीर केल्या, नवीन निवड झालेल्या सर्व पदाधिकारी यांचा क्रीडाधिकारी भाग्यश्री बिले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला व स्पर्धा आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या. बोरावके कॉलेजचे क्रीडा संचालक संभाजीराव ढेरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button