अहमदनगर

गुरुवर्यांच्या हस्ते झालेला सत्कार माझ्या सेवाकार्याला बळ देईल – मा. मुख्याध्यापक भागचंद औताडे पाटील

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : शिक्षण हॆ व्यक्ती आणि समाज विकासाचे साधन आहे. शिक्षण क्षेत्रात दीर्घकाळ सेवा केल्यानंतर माझ्या कार्याची देशपातळीवर दखल घेतली, त्याबद्दल माझ्या ग्रामीण शेतमळ्यात येऊन गुरुवर्यांनी केलेला प्रेरणादायी सत्कार माझ्या सेवाकार्याला आशीर्वादरुपी बळ देणारा असल्याचे मत स्नेहगृपचे संस्थापक सदस्य माजी मुख्याध्यापक भागचंद औताडे पाटील यांनी व्यक्त केले.

श्रीरामपूर येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठान, विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान यांच्यातर्फे माळेवाडी येथील मा. मुख्याध्यापक भागचंद औताडे पाटील यांची अखिल भारतीय राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाच्या मुख्य प्रदेश संघटकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला, त्या सत्कार कार्यक्रमात औताडे सर बोलत होते. साहित्यिक डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत करून, प्रास्ताविकामधून मुख्याध्यापक भागचंद औताडे पाटील यांच्या शैक्षणिक, सामाजिक, सेंद्रियकृषी उपक्रम योगदानाचा परिचय करून दिला.

ॲड. रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष, रयत शिक्षण संस्थेचे माजी प्राचार्य टी. ई. शेळके, स्वाध्याय परिवाराचे जेष्ठ मार्गदर्शक सदस्य माजी प्राचार्य डॉ.शंकरराव गागरे, विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव सुखदेव सुकळे, सुदामराव औताडे पाटील यांनी नूतन मुख्याध्यापक राज्य संयुक्त महामंडळाचे मुख्य प्रदेश संघटक भागचंद औताडे पाटील, सौ.प्रमिलाताई औताडे या दोघांचा बुके, शाल, पुस्तके, भेटवस्तू देऊन सन्मान केला.

यावेळी सुखदेव सुकळे यांनी भागचंद औताडे यांच्या संदर्भात बोरावके महाविद्यालयातील विद्यार्थी अवस्थेतील विद्यापीठ प्रतिनिधी आणि योगदानाच्या आठवणी सांगितल्या. प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे यांनी खासदार गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेतील भागचंद औताडे यांचे आदर्श कार्य सांगितले. प्राचार्य शेळके यांनी माळेवाडी येथील धोंडू औताडे पाटील, दगडू औताडे पाटील परिवार यांच्याशी असलेले ॲड. अण्णासाहेब शिंदे, ॲड. रावसाहेब शिंदे यांच्याशी असलेले घनिष्ठ संपर्क आणि माळेवाडीतील आदर्श ग्रामस्थ, आजचे प्रगतीशील युवक यांचे कौतुक करून भागचंद औताडे पाटील यांचा कर्तृत्वगौरव केला. मुख्याध्यापक भागचंद औताडे पाटील यांनी आपणास मिळालेल्या संघटक पदाचा सर्वांना उपयोग होईल असे सांगितले. धनंजय औताडे पाटील यांनी नियोजन केले. सुदामराव औताडे पाटील यांनी मनोगत व्यक्त करून आभार मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button