गुन्हे वार्ता

राहुरी पोलिसांनी गावठी कट्टयासह एकास पकडले

पोलीस निरिक्षक धनंजय जाधव यांच्या पथकाची कारवाई

राहुरी | अशोक मंडलिक : शहरातील हॉटेल ग्रीन समोरील रोडवर गावठी कट्ट्यासह नेवासा तालुक्यातील एकास राहुरी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

राहुरीचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली असून शहरातील हॉटेल ग्रीन समोरील रोडवर नितीन भाऊसाहेब आल्हाट, वय 33 वर्ष, रा. मोरया चिंचोरे, ता. नेवासा याला राहुरी पोलिसांनी पकडले असून त्याच्याकडून ३० हजार रुपये किंमतीचा एक स्टिल सारख्या धातुचा काळे व सिल्वर रंगाचा गावठी कट्टा, त्यामध्ये एक काळे रंगाची मैंगझीन असलेला व ५०० रुपये किमतीचे एका प्लॅस्टिकचे पिशवीत पितळी रंगाचे पाच राऊंड व २० हजार रुपये किंमतीचा व्हिओ कं.चा मोबाईल जप्त केला आहे.

आरोपी नितीन आल्हाट हा गावठी कट्टा व राऊंड विना परवाना बेकायदा विक्री करण्याचे उद्देशाने स्वत:चे कब्जात बाळगताना मिळुन आल्याने राहुरी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध आर्म ऍक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील करीत आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button