ठळक बातम्या

लोकनेते रामदास पाटील धुमाळ कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय राहुरीच्या प्रभारी प्राचार्यपदी प्रा. गोसावी यांची नियुक्ती

राहुरी : येथील लोकनेते रामदास पाटील धुमाळ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय राहुरी च्या प्रभारी प्राचार्य पदी प्रा. डॉ. राजेंद्र गोसावी यांची निवड करण्यात आली.

डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या सलग्न असणाऱ्या शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते रामदास पाटील धुमाळ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजीराव पठारे हे प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. रिक्त झालेल्या प्राचार्य पदाच्या जागेवर प्राध्यापक डॉ. राजेंद्र गोसावी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्राचार्य गोसावी हे अनेक वर्षांपासुन या महाविद्यालयात विज्ञान शाखेत विभाग प्रमुख म्हणुन कार्यरत आहे. प्राचार्य गोसावी हे विद्यार्थी प्रिय शिक्षक असुन त्यांचे आजी माजी विद्यार्थी व शिवाजी शिक्षण मंडळाचे प्रशासकीय मंडळ, शिक्षक आदींनी अभिनंदन केले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button