अहमदनगर

वाळू धोरणाचे स्वराज्य संघटनेकडून स्वागत- इंजी. कानवडे

सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न तर बांधकाम व्यावसायास चालना मिळणार

संगमनेर शहर : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाळू तस्करी रोखण्यासाठी व बांधकाम व्यवसायाला चालना देण्यासाठी घेतलेली भुमिका योग्य असून या वाळू धोरणाचे स्वराज्य संघटनेच्या वतीने स्वागत करत असल्याची प्रतिक्रिया जिल्हा निमंत्रक इंजी. आशिष कानवडे यांनी दिली.

गेली अनेक वर्षांपासून वाळू तस्करीमुळे ओढे, नाले व नदी पूर्णपणे पोखरल्या असून या व्यवसायातील तरुण पिढी मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन झाली असून वाळू तस्करांच्या दहशतीमुळे वातावरण पुर्णपणे बिघडले होते. मात्र गेली सहा महिन्यात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाळु तस्करी रोखण्यासाठी जी रास्त आणि कडक भुमिका घेतली त्यामुळे जवळपास बहुतांश ठिकाणी वाळु तस्करीला पायबंद बसला आहे.

त्यात वाळु विक्री करण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या धोरणामुळे वाळू ऑनलाईन पद्धतीने स्वस्त मिळणार असल्याने वाळू माफियांना चाप बसणार असून गोरगरिबांची घरकुले उभी राहण्यासाठी चांगलाच हातभार लागणार असल्याने बांधकाम क्षेत्राला व सामान्य माणसांना दिलासा मिळाला असून महसूलमंत्री ना. विखे पाटील यांनी वाळू तस्करी रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना तसेच वाळू विक्री करण्यासाठी व घरपोहोच मिळण्यासाठी केलेल्या उपाययोजनेचे सर्वत्र स्वागत होत आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button