अहमदनगर
श्रीरामपूर नगरपालिका शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी सचिन शिंदे, सरचिटणीसपदी शरद नागरगोजे
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : नगरपालिका महानगरपालिका शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य या शिक्षक संघटनेच्या श्रीरामपूर नगरपालिका शाखेच्या अध्यक्षपदी सचिन रमेश शिंदे यांची तर सरचिटणीसपदी शरद सुंदरराव नागरगोजे यांची निवड अहमदनगर जिल्हाध्यक्ष फारुकभाई शाह यांनी केली.
राज्याचे अध्यक्ष अर्जून कोळी यांनी नगरपालिका, महानगरपालिका शिक्षक संघाच्या माध्यमातून सातवा वेतन आयोग, 100% पगारासाठी आझाद मैदानात लक्षवेधी आंदोलन, जुन्या पेन्शनसाठी कोर्टात लढा सुरू आहे, विनंती बदलीसाठी ऑनलाईन पोर्टल सुरु करणेसाठी प्रयत्न, राज्यातील नगरपालिका महानगरपालिका शिक्षकांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक व आदर्श शाळा पुरस्कार योजना सुरू केली, आदि धडाकेबाज कार्य पाहून राज्यातील अनेक संघटना महाराष्ट्र राज्य नगरपालिका महानगरपालिका शिक्षक संघात विलीन झाल्या आहेत.
शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी सचिन रमेश शिंदे, सरचिटणीस पदी शरद नागरगोजे यांच्या निवडीबद्दल राज्याध्यक्ष अर्जुन कोळी, कार्याध्यक्ष सुभाष कोल्हे, सरचिटणीस अरुण पवार, श्रीरामपूर नगरपालिका प्रशासनाधिकारी ज्ञानेश्वर पटारे, राज्य संघटक नवनाथ अकोलकर, रूपेश गुजर, किशोर त्रिभुवन, राज्य सदस्य विजय शेळके, राजेश बनकर, बाबासाहेब मते, चंद्रकांत मोरे, कल्याण डोंबिवलीचे अध्यक्ष अनिल तुपे, अहमदनगर जिल्हाध्यक्ष फारुकभाई शाह, सरचिटणीस विलास माळी, उपाध्यक्ष भाऊसाहेब कबाडी, कोषाध्यक्ष अमोल संभाजी त्रिभुवन, बोठे, अहमदनगर जिल्हा महिला आघाडी प्रमुख सविता साळुंके, राज्य सल्लागार सुनिल रहाणे, जिल्हा संपर्कप्रमुख अजय शिंदे, सल्लागार ताराचंद पगारे, रजनी कर्डीले, कांचन मुसळेे, कृष्णाताई थोरे, सुरेखा डांगे, कल्पना जगताप, मंदाकिनी गायकवाड, मनिषा सांगळे, योगिता हुडे, सुनिता थोरात, दिपाली घेगडे, वर्षाताई वाकचौरे आदींनी अभिनंदन केले.