अहमदनगर
आज कारेगाव येथे महिला सन्मान व प्रबोधन मेळाव्याचे आयोजन
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : कारेगाव येथील भाऊसाहेब जनसेवा केंद्रातर्फे आज महिला दिनानिमित्त भव्य महिला सन्मान, प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजिका सौ.अनिता भाऊसाहेब भवार पाटील यांनी दिली.
कारेगाव येथील प्राचार्य भाऊसाहेब भवार पाटील बहुउद्देशीय सांस्कृतिक सभागृहात होणाऱ्या या मेळाव्याचे उद्घाटन श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापती डॉ. वंदनाताई ज्ञानेश्वर मुरकुटे यांच्या हस्ते होणार आहे. सरपंच सौ. उषाताई पटारे, मा.सरपंच सौ. अनुराधा बाळासाहेब पटारे, उपसरपंच सौ. ज्योतीताई विजयराव पटारे, तलाठी प्रज्ञाताई दयाराम माटे, महिला मंडळ यांच्यासह प्राचार्य शन्करराव अनारसे, प्राचार्य टी. ई. शेळके, प्राचार्य डॉ. शन्करराव गागरे, डॉ. बाबुराव उपाध्ये, पत्रकार प्रकाश कुलथे, प्रा. शिवाजीराव बारगळ, लेविन भोसले, कवयित्री संगीता फासाटे, पत्रकार राजेंद्र देसाई, कवी, गीतकार बाबासाहेब पवार, कवी आनंदा साळवे, कवी सागर आदींसह मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली.
या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्राचार्य भाऊसाहेब भवार पाटील, सौ. अनिता भाऊसाहेब भवार पाटील, अमोलराजे भवार पाटील आदिंनी केले.