अहमदनगर
उद्या श्रीरामपूरसह नगर जिल्ह्यात ईपीएस 95 पेन्शनर मेळावे
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : अहमदनगर जिल्ह्यातील इपीएस 95 पेन्शनरांचे विविध ठिकाणी राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने मेळावे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती पश्चिम भारत संघटक सुभाष पोखरकर यांनी दिली.
गुरुवार, ९ मार्च रोजी सकाळी ९:३० वाजता शेवगाव, सकाळी ११ वाजता पाथर्डी, दुपारी १ वाजता काँग्रेस भवन, श्रीरामपूर ३ वाजता जामखेड, सायंकाळी ५:३० वाजता कर्जत तसेच दि ११ मार्च रोजी सकाळी ११ वाजता कॉम्रेड बाबासाहेब ठुबे पतसंस्था सभागृह नविपेठ पारनेर, रविवार दि १२ मार्च रोजी दुपारी २ वाजता पेन्शनर भवन संगमनेर येथे सभा आयोजित करण्यात आल्या आहेत.
या सभेत पश्चिम भारत संघटक सुभाषराव पोखरकर, जिल्हाध्यक्ष संपतराव समिंदर, उपाध्यक्ष एस.के.सय्यद, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष भगवंत वाळके आदी पदाधिकारी हे मा.सुप्रीम कोर्ट निर्णय, रास्ता रोको आंदोलन आदी विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.
तरी जास्तीत जास्त पेन्शन धारकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष संपतराव समिंदर, एस के सय्यद, सुकदेव आहेर, राधाकृष्ण धुमाळ, बापूराव बहिरट, यशवंत औटी, याकूब शेख, शिवाजी बंगाळ, ज्ञानदेव डौले, अशोक देशमुख, दशरथ पवार, नवाजभाई शेख, दिलावर शेख, सुलेमान शेख, लक्ष्मण हासे, विनायक लोळगे, रायभान तुपे, चिंतामणी, सावंत, कटारिया आदींनी केले आहे.