ठळक बातम्या
सुभाष दरेकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित
सिनेअभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार स्वीकारताना सुभाष दरेकर समवेत बाबासाहेब पावसे व मान्यवर.
श्रीगोंदा : अखिल भारतीय क्रांतिसेनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुभाष दरेकर यांना सिनेअभिनेत्री अलका कुबल-आठल्ये यांच्या हस्ते राज्यस्तरीय समाजभूषण-२०२३ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आज महिला दिनानिमित्त अहमदनगर येथील माऊली संकुल सभागृह येथे स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने ” मान कर्तृत्वाचा सन्मान नेतृत्वाचा ” राज्यस्तरीय पुरस्कार या कार्यक्रमाचे महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वराज्य सरपंच सेवा संघाचे संस्थापक बाबासाहेब पावसे, हिरडगावचे माजी सरपंच रामभाऊ गुणवरे, श्रीगोंदा तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक भरत भुजबळ, शांताराम भुजबळ, वसंत दरेकर, भाऊसाहेब मोरे, निलेश दरेकर, प्रदीप दरेकर, राम भुजबळ, आकाश दरेकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सुभाष दरेकर हे सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील असून त्यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही जिद्द व संघर्षातून त्यांनी क्रांतीसेनेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने त्यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल दरेकर यांचे क्रांतीसेनेच्या मार्गदर्शिका माजी महसूलमंत्री डॉ. शालिनीताई पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम आण्णा शेलार, क्रांतीसेनेचे अध्यक्ष संतोष तांबे पाटील, सरचिटणीस नितीन देशमुख, संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील, शिक्षक आघाडी प्रदेशाध्यक्ष भागचंद औताडे, भुमी फांडेशन चे अध्यक्ष कैलास पवार, रंगनाथ माने, मच्छिंद्र जगताप, बाबासाहेब चेडे, अविनाश कुरुमकर, संदीप डेबरे, रायचंद दरेकर, जालिंदर शेडगे, संदीप ओहोळ, नवनाथ ढगे, शब्बीर शेख, बाळासाहेब भोर, शेखर पवार, श्याम कदम आदींसह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.