अहमदनगर
उंदीरगाव येथील महिलांची अशोक कारखान्याच्या विविध प्रकल्पांना भेटी
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : उंदिरगाव येथील महिलांची सहल अशोक सहकारी साखर कारखाना येथे आयोजित करण्यात आली होती. माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्याकडे चाळीस वर्षांपासुन एकहाती सत्ता असलेला अशोक कारखाना (अशोक उद्योग समुह) प्रगतीचे वाटेवर आहे. या सहलीत महिलांनी अशोक कारखान्याचा विज निर्मिती प्रकल्प, नविन आसवनी इथेनॉल प्रकल्प, कारखाना कार्यस्थळावरील संलग्न शैक्षणिक संस्था तसेच संपुर्ण परिसर पाहुन आनंद व्यक्त केला.
यावेळी मुळा-प्रवरा वीज संस्थेचे संचालक युवानेते सिध्दार्थ मुरकुटे, संचालिका सौ. मंजुश्रीताई मुरकुटे, कारखान्याचे संचालक विरेश पाटील गलांडे, राजेंद्र नाईक, मंजाबापू नाईक, सोपानराव नाईक, खर्डे, पाराजी राऊत, भिमराज बागुल, अशोक बांद्रे, विजय ताके, सरपंच सुभाष बोधक, रवि गायकवाड आदींसह इतर मान्यवर व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.