अहमदनगर

मतमाऊली भक्तीस्थान स्वागत कमानीचा लोकार्पण सोहळा मा. आ. मुरकुटे यांचे हस्ते संपन्न

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे – संत तेरेजा चर्च व मतमाऊली भक्ती स्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याचे स्वागत कमानीचा लोकार्पण सोहळा अशोक कारखाना चेअरमन भानुदास मुरकुटे यांचे हस्ते नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष हरेगाव धर्म प्रांताचे धर्मगुरु डोमॅनिक रोझारिओ होते.
याप्रसंगी आपल्या प्रमुख भाषणात चेअरमन भानुदास मुरकुटे म्हणाले की, हरेगाव-उंदिरगाव येथील मतमाऊली भक्ती स्थान संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द असून मतमाऊलीचे महाराष्ट्रभर भक्तगण आहे. सप्टेंबर मध्ये होणाऱ्या मतमाऊली यात्रेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून तर भारतभरातून माऊली भक्त दर्शनासाठी येतात. मतमाऊली भक्ती स्थानाकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यावर कमान असावी अशी मागणी चर्चचे धर्मगुरु व चर्चचे सदस्य यांनी केली असता अशोक सहकारी साखर कारखान्याच्या सौजन्याने तात्काळ स्वागत कमान देणेचा निर्णय घेण्यात आला.
या कमानीचे आज लोकार्पण होत असताना विशेष असा आनंद होत आहे. आतापर्यंत हरेगाव येथील मतमाऊली भक्ती स्थानासाठी जे जे शक्य असेल ती मदत अशोक कारखान्यामार्फत तसेच आपल्या आमदारकीच्या काळात आपण केलेली आहे. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष फा.डोमॅनिक रोझारिओ यांनी मतमाऊली भक्ती स्थानाकडे जाणार्‍या रस्त्यावर स्वागत कमान दिल्याबद्दल अशोक  कारखान्याचे सुत्रधार भानुदास मुरकुटे व माजी चेअरमन सुरेश गलांडे, अशोक कारखाना संचालक विरेश गलांडे यांचे आभार व्यक्त केले.
याप्रसंगी फा. रिचर्ड, फा. सचिन, अशोक कारखाना संचालक विरेश पा.गलांडे, लक्ष्मणराव सरोदे, राजेंद्र पाऊलबुध्दे, बाळासाहेब नाईक, भिमभाऊ बांद्रे, सुभाष बोधक, रमेश गायके, विठ्ठलराव सोमोसे, बाळासाहेब आदिक, सोपानराव नाईक, दादासाहेब खर्डे, सुभाष शिंदे, पांडूरंग राऊत, विजय ताके, अमोल नाईक, राजेंद्र गिऱ्हे, विनायक भालदंड, शंकरराव आढाव, योहान पंडीत, प्रमोद भालदंड, संदीप ताके, भगवान आबा ताके, नितीन गलांडे, अ‍ॅॅड. विष्णुपंत ताके, अशोकराव बांद्रे, सुभाष पंडीत, चंद्रकांत गायकवाड,
भुमि फाऊंडेशन समन्वयक भिमराज बागुल, अशोक गुळवे, आप्पासाहेब ताके, शिवाजी राऊत, पत्रकार फिलीप पंडीत, धिवर, ज्यो दिवे, बाबासाहेब नाईक, बबनराव नाईक, शिवाजीराव आढाव, सुभाषशेठ चोरडिया, रमेश भालेराव, रत्नमाला जाधव, मंजाबापू नाईक, विल्सन दुशिंग, गिता, दिलीप मोरे, पिटर जाधव, रमेश पंडीत, मनोज गायकवाड, दिपक बोधक, वाल्मीक लोंढे, वाय.जी.त्रिभुवन, फान्सीस हिवाळे, राहूल निकम, सर्व सिस्टर्स, विद्यार्थी व हरेगाव, उंदिरगाव  ग्रामस्थ मोठ्या संंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजेंद्र नाईक यांनी केले, प्रास्तविक फिलीप पंडीत तर आभार विलास साळवे यांनी व्यक्त केले.

Related Articles

Back to top button