साहित्य व संस्कृती

साहित्य संमेलने ही माझ्यासाठी माणुसकीची तीर्थस्थळे होय- डॉ. बाबुराव उपाध्ये

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : साहित्य आणि साहित्यिक यांच्यामुळे संस्कार आणि जीवनमूल्यांची प्रतिष्ठापना होते म्हणूनच साहित्य संमेलने ही माझ्यासाठी माणुसकीची तीर्थस्थळे असल्याचे मत श्रीरामपूर येथील ग्रामीण साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केले.
शेवगाव तालुक्यातील प्रभुवाडगाव येथे शिवप्रभू स्वामी ग्रामीण साहित्य कला, क्रीडा, सांस्कृतिक मंचने आयोजित केलेल्या कविसंमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी अहमदनगर येथील माजी पोलीस अधिकारी, अभिनेते, कवी सुभाषदादा सोनवणे होते. त्यांनी कवी, शिक्षक गबाजी बळीद आणि शाळेचे कौतुक केले, कविता सादर केल्या. यावेळी कवी रज्जाक शेख, आनंदा साळवे, बाळासाहेब कोठुळे, विद्याताई भडके, सविता ढाकणे, आत्माराम शेवाळे, संजय माकोणे, डॉ. प्रभाकर शेळके, नितीन गायके, कवी गवाजी बळीद, इम्रान शेख, यांच्यासह बालकवींनी बहारदार कविता सादर केल्या. संयोजक शिक्षक गवाजी बळीद यांनी स्वागत, प्रास्ताविक करून कवींचा परिचय करून दिला. सर्व कवींना सन्मानचिन्ह, शाल, बुके, पुस्तके देऊन सत्कार केले.

शेवगाव तालुकयातील प्रभूवाडगाव येथे झालेल्या कविसंमेलन प्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. बाबुराव उपाध्ये, संयोजक शिक्षक गबाजी बळीद, कवी रज्जाक शेख, आनंदा साळवे, नितीन गायके, विद्या भडके, सविता ढाकणे, बाळासाहेब कोठुळे, गोरक्षनाथ पवार, आत्माराम शेवाळे, संजय माकोणे, इमरान शेख, सरपंच ज्ञानदेव घोडेराव, महादेव बटुळे आदींसह शिक्षक, ग्रामस्थांना सन्मानचिन्हे देऊन गौरविण्यात आले.

दिवसभर विविध उपक्रम संपन्न झाले. शेवगावच्या पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी तृप्ती ताई कोलते यांनी उपक्रमाचे उदघाटन केले. पुणे येथील सहपरीक्षाआयुक्त अनिल गुंजाळ यांचे “आनंदाने जगू या “या विषयावर संस्कारशील व्याख्यान झाले. गटशिक्षणाधिकारी महेश डोके, विस्तार अधिकारी शैलजा राऊळ, सहाय्य्क सुरेश पाटेकर, बालविकास प्रकल्प अधिकारी बी. के. गडदे, विस्तार अधिकारी डॉ. शन्कर गाडेकर, केंद्रप्रमुख बाबासाहेब केदार, सह. बँक संचालक रमेश गोरेे, जालना येथील जेष्ठ अधिव्याख्याता जालिंदर बटुळे, औरंगाबाद येथील डॉ. विशाल तायडे, नगर आकाशवाणीचे सुदाम बटुळे, स्वागताध्यक्ष सरपंच ज्ञानदेव घोडेराव, महादेव बटुळे, परमेश्वर जायभाये, मुख्याध्यापक सातपुते, ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सांयकाळी बहारदार स्नेहसंमेलन झाले.
डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी ‘शब्दसेतू ‘सादर करून कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथे कवी बळीद यांनी केलेले कवीसंमेलनाच्या आठवणी सांगून कवी बळीद यांनी प्रभूवाडगावला साहित्यक्षेत्रात नावलौकिक मिळवून देण्याचे कार्य करीत आहेत. एक आदर्श, उपक्रमशील शिक्षक म्हणून कवी बळीद यांचा सत्कार कवींनी केला.

Related Articles

Back to top button