ठळक बातम्या

खा.संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची शिवसेनेची मागणी

राहुरी – शिवसेनेच्या वतीने राहुरी पोलिस स्टेशन येथे उप पोलिस निरीक्षक सज्जन नर्हेडा यांना निवेदन देवून खा. संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना तालुका प्रमुख देवेंद्र लांबे यांच्यासह राहुरी तालुका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा: खा.संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची शिवसेनेची मागणी

राहुरी पोलिस ठाण्यास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, संजय राऊत हे खासदार असून सामना वृत्तपत्राचे संपादक आहेत. राऊत यांनी दिनांक २० फेब्रुवारी २०२३ रोजी प्रसार माध्यमांना मुलाखत देऊन त्यामध्ये हिंदी भाषेमध्ये पुढील प्रमाणे वक्तव्य केलेले आहे. “श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊत को खतम करने की एक सुपारी जिसे बोलते है कॉन्ट्रॅक्ट किलिंग, एक माफिया जो अभी अभी जमानत पे छुटा है, राजा ठाकूर उनका नाम है, उनको ये कॉन्ट्रॅक्ट किलिंग का काम दिया है, यह मेरी जानकारी है, तो मेरा यह कर्तव्य बनता है, इस राज्य के बुद्धिमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीसजी, मुंबई के पोलीस कमिशनर, ठाणा के पोलीस कमिशनर, को यह अवगत करे, अशा प्रकारची मुलाखती त्यांनी वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांना दिल्या. तसेच तदनंतर श्री. राऊत यांनी यासंदर्भात लिखित तक्रारी अर्ज पोलिसांकडे सादर केला. संजय राऊत यांनी सदरचा खोटा अर्ज त्यांचे राजकीय व वैयक्तिक स्वार्थापोटी प्रसिद्धी मिळविण्याकामी केलेला आहे.
शिवसेना पक्षाचे श्रीकांत शिंदे हे लोकसभेचे खासदार असून त्यांच्यावर आत्तापर्यंत गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप कधीही झालेले नाही. विरोधात बदनामीकारक शब्दांचा वापर करून संजय राऊत यांनी आमच्या पक्षातील नेते, कार्यकर्ते, नागरिकांमध्ये भावनिक व तीव्र नाराजीची भावना निर्माण केली आहे. त्यामुळे मी स्वतः व माझ्यासारखे इतर कार्यकारी उदिग्न झाले आहोत. संजय राऊत यांनी सदरची मुलाखत व खोटा तक्रारी अर्ज देऊन राजकीय पक्ष व लोकांमध्ये द्वेष, भावना, तेढ, वैमनस्य निर्माण करण्याचा जाणीवपूर्व कृत्य केलेले आहे.
तरी शिवसेना पक्षाचे जेष्ठ नेते खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबाबत जाणीवपूर्वक खोटे आरोप करून बदनामी कारक व द्वेष कारक बातमी पसरवून समाजामध्ये द्वेषाची भावना तेढ वैमानस्य निर्माण करण्याचे जाणीवपूर्व कृत्य केलेले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी शिवसेना राहुरी प्रमुख देवेंद्र लांबे, तालुका संघटक अशोक तनपुरे, शेतकरी आघाडी प्रमुख किशोर मोरे, राजेंद्र लबडे, प्रभाकर तुपे, किशोर सोनवने, औदुंबर करपे, रणजीत चव्हाण आदींनी केली आहे.

Related Articles

Back to top button