अहमदनगर
शिरसगाव येथे नवीन विद्युत रोहित्राचा शुभारंभ
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील शिरसगाव येथील प्रंशात गवारे व दत्तात्रय गवारे यांच्या शेतातील नवीन विद्युत रोहित्राचा शुभारंभ माजी संरपच अशोकराव पवार यांच्या हस्ते झाला. त्यावेळी खरेदी विक्री संघाचे चेअरमन गणेशराव मुदगुले, सुरेश ताके, दत्तात्रय पवार, मधुकर गवारे, लक्ष्मणराव यादव, मनोज रासकर, संदिप वाघमारे, दत्तात्रय बकाल आदि उपस्थित होते. नवीन विद्युत रोहित्रामुळे परिसरातील शेतकऱ्यांची गैरसोय दूर झाली आहे.