साहित्य व संस्कृती

संत गाडगेबाबांच्या जयंतीला “लॉकडाऊनच्या कविता” संग्रहावर परिसंवादाने केलेले अभिवादन प्रेरणादायी- प्राचार्य टी. ई. शेळके

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : महाराष्ट्र ही संतांची आणि वीरांची भूमी असून ग्रामस्वच्छतेचा आरोग्यमंत्र आपल्या उक्ती, कृतीतून दिला. महान संत गाडगेमहाराज यांच्या विचारांचा असा कार्यवारसा आपण जपला पाहिजे, डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या “लॉकडाऊनच्या कविता “संग्रहावर घेतलेला परिसंवाद ही संत गाडगेबाबांना यांनी भक्तिपूर्वक केलेली मानवंदना प्रेरणादायी असून त्यातून वाचन संस्कृतीची जोपासना होणार असल्याचे मत माजी प्राचार्य टी. ई. शेळके यांनी व्यक्त केले.
येथील मार्केट यार्ड शिवाजीनगर भागातील श्रीसंत गाडगे महाराज यांच्या 147व्या जयंतीसोहळ्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी नगराध्यक्ष संजय फ़ंड, जेष्ठ नागरिक आनंद मेळाव्याचे अध्यक्ष लक्ष्मणराव निकम यांच्या हस्तें जयंती उत्सवाला प्रारंभ झाला. त्यांच्या मार्गदर्शनातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी श्रीविठ्ठल रुक्मिणी आणि श्रीसंत गाडगेबाबा यांच्या मूर्तीचे पूजन प्राचार्य शेळके व उपस्थित भक्तगणांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. संयोजक, पत्रकार राजेंद्र देसाई यांनी स्वागत करून मूर्तिपूजनाचे नियोजन केले.यावेळी ग्रामीण साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या ‘लॉकडाऊनच्या कविता ‘ ह्या कवितासंग्रवर परिसंवाद झाला.
कवी, गीतकार बाबासाहेब पवार, डॉ.बाबुराव उपाध्ये,प्रा. शिवाजीराव बारगळ यांनी पुस्तकावर आणि संत गाडगेबाबा यांच्या जीवनचरित्रावर भाष्य करीत संतविषयक कविता सादर केल्या. प्राचार्य शेळके यांनी श्रीसंत गाडगेबाबा यांचे साधी जीवनशैली आणि गोड, मधुर पण पुरोगामी साधी बोलीभाषा ही ग्रामीण समाजाला खऱ्या भक्तीचा आणि आरोग्याचा मंत्र देणारी आहे, ती चरित्र वाचनातून समजून घ्यावी. कवी हा मोजक्या शब्दांत मोठा जीवन आशय सांगतो डॉ. उपाध्ये यांच्या पुस्तकातील कविता असा अनुभव देतात, त्यांनी ह्यानिमित्ताने वाचन संस्कृतीला भक्तीचा अर्थ दिला, त्याबद्दल कौतुक केले.
परदेशी महाराज, सुखदेव सुकळे, रामनाथ सावंत, जगदीश जाधव, सुनील जोर्वेकर, दिनेश तरटे, चिंतामणी काळे, राजेंद्र नारायणे, लॉंड्री संघटना राज्य संपर्क प्रमुख दीपक दळवी, पोपटराव नलावडे, सुनील राऊत आदिंनी संत गाडगेबाबांच्या मूर्तीचे पूजन केले. कुंडलिक खैरनार यांनी मनोगत व्यक्त केले. कवी, गीतकार बाबासाहेब पवार यांनी सूत्रसंचालन केले. पत्रकार, कवी राजेंद्र देसाई यांनी आभार मानले.

Related Articles

Back to top button