अहमदनगर

सुनिता नागरे यांना साने गुरुजी शिक्षक प्रतिभा पुरस्कार

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : खा गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कै रघुनाथ कृष्णाजी औताडे पा. विद्यालय माळेवाडी येथील शिक्षिका श्रीमती सुनिता नागरे [शिरसगाव] यांना शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल नुकताच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व शब्दगंध काव्य मंच यांच्या वतीने श्यामची आई कृतज्ञता सोहळ्यात साने गुरुजी शिक्षक प्रतिभा पुरस्कार जेष्ठ साहित्यिक डॉ श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते ऑटो क्लस्टर, पुणे सभागृहात प्रदान करण्यात आला.
श्रीमती नागरे ह्या २३ वर्षापासून माळेवाडी येथे शिक्षक आहेत. या पुस्काराबाद्द्ल संस्था सचिव अविनाश आदिक, माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, सहसचिव जयंतराव चौधरी, सर्व गव्ह. कौन्सिल सदस्य, प्राचार्य वसीम सय्यद व सर्व शिक्षक, कर्मचारी, शिरसगाव, माळेवाडी ग्रामस्थ आदींनी अभिनंदन केले.

Related Articles

Back to top button