अहमदनगर

मतमाऊली भक्तीस्थानाकडे कमान उभारण्यास मा. आ. मुरकुटेंची मंजुरी

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील मत माऊली भक्तिस्थान हरेगाव कडे जाणाऱ्या रस्त्यावर धार्मिक कमान मिळावी या मागणीचे निवेदन लोकनेते माजी आ. भानुदास मुरकुटे यांना संत तेरेजा चर्च मतमाऊली भक्तिस्थान चे प्रमुख धर्मगुरू फा.डॉमिनिक व चर्च सभासदांनी दिले असता त्यांच्या मागणीला मुरकुटे यांनी तात्काळ मंजुरी दिली.
आ. मुरकुटे यांच्याकडे मागणी केल्यानंतर त्यांनी तात्काळ मंजुरी दिल्याने त्यांचे सर्वांनी आभार मानले. यावेळी फा. डॉमिनिक यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संचालक विरेश गलांडे, सरपंच सुभाष बोधक, सुभाष पंडित, जो दिवे, रमेश पंडित, जेम्स पंडित, अंतोन क्षीरसागर, विलास साळवे, नीरज बनसोडे आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button