ठळक बातम्या

छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत १ जानेवारी रोजी संगमनेर येथे छावा क्रांतिवीर सेना वर्धापन दिनाचे आयोजन

संगमनेर शहर : स्वराज्य प्रमुख श्रीमंत छत्रपती संभाजीराजे हे संगमनेर तालुक्यातील ऐतिहासिक निमगाव बु येथे १ जानेवारी रोजी आयोजित छावा क्रांतिवीर सेना या संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्याची माहिती छावा क्रांतिवीर सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष कानवडे यांनी दिली आहे.
या वर्धापन दिनासाठी छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष, स्वराज्य प्रवक्ते करण गायकर, कामगार नेते अभिजित राणे, संघटनेची प्रदेश कार्यकारणी, विभागीय, जिल्हा, तालुका पातळीवरील मान्यवरांसह संघटनेचे सर्व पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच उपस्थित राहणार आहेत. ह्या वर्धापन दिनामध्ये छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने अनेक विषयांवर आवाज उठविला जाणार आहे. त्यात शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव, शेतीपंपासाठी वीज मोफत, सक्तीची कर्जवसुली बंद करणे, महाराष्ट्रातील शैक्षणिक व आरोग्याच्या बाबतीत गाव पातळीपासून ते प्रदेश पातळीपर्यंत सुधारणा करणे या सर्व यंत्रणा भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी राज्य शासनाने कडक धोरणे अवलंबावी, सहकार क्षेत्रातील कामगारांना किमान वेतन कायदा मंजूर करणे, महिला सबलीकरण, महाराष्ट्रातील थोर महापुरुषांविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या वाचाळ व्यक्तींविरोधात कठोर असा कायदा पारित करणे, महाराष्ट्रातील सर्व गड किल्ल्यांचे संवर्धन करणे या विषयावर आवाज उठविला जाणार आहे.
या मागण्यांसाठी खुद्द छत्रपती घराण्याचे वंशज, स्वराज्य प्रमुख श्रीमंत छत्रपती संभाजीराजे येत असल्याने या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी शिवप्रेमींमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. त्यामुळे या ऐतिहासिक वर्धापन दिनासाठी शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष आशिष कानवडे, रोहित यादव, उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख संजय चौधरी, आरोग्य आघाडी प्रदेशाध्यक्ष शांताराम गायकवाड, शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष रवींद्र डुबे, संदीप वरखडे, गणेश थोरात, संदिप राऊत, रामनाथ कानवडे, भागवत कानवडे, सचिन कानवडे, अमीन शेख, गणेश फरगडे, लक्ष्मण सातपुते, सतिष गोपाळे, लहानू नेहे, दत्ता शेटे आदिंसह संघटनेच्या पदाधिकारी यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button