औरंगाबाद

तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ शासकिय मदत द्या – शेतकरी संघटना

विलास लाटे | पैठण : सन २०२० ते सन २०२३ या तीन वर्षापासून विमा भरलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून पिकविम्याचे पैसे आजपर्यंत मिळालेले नाही. पीएम किसान योजनेचे पैसे बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्याने गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील शेतकरी कार्यालयात खेट्या मारीत आहे. यासंबंधि काहि आडचणी असतील तर त्या तात्काळ सोडविण्यात याव्यात अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदनातून करण्यात आली.
सन २०१९ पासून ज्या शेतकऱ्यांना अपात्र ठरवलेले आहे, त्यांनासुद्धा पीएम किसान योजनेची मदत देण्यात यावी. तसेच परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून याबाबत सर्व शेतकऱ्यांना कोणतीही अट न घालता सरसगट हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून तात्काळ देण्यात यावी, अशी मागणी देखील शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदार पैठण यांच्याकडे नुकतीच निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनावर शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रशिद शेख (मौलाना), शेतकरी संघटना पुरस्कृत स्व. भा. पक्षाचे तालुकाध्यक्ष कांताराव जाधव, शिवाजी सोनवणे व वसंत शेजुळ आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Back to top button