धार्मिक

उंदीरगाव येथे अखंड हरीनाम सप्ताह व भव्य कीर्तन महोत्सव

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील उंदीरगाव हनुमान मंदिर येथे सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज, ब्रम्हलीन सद्गुरू नारायणगिरी महाराज, गुरुवर्य महंत रामगिरी महाराज [श्रीक्षेत्र गोदाधाम बेट] तसेच गुरुवर्य महंत भास्करगिरी महाराज [देवगड] यांच्या आशीर्वादाने अखंड हरीनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तसेच भव्य कीर्तन महोत्सव ३० एप्रिल पासून प्रारंभ होणार असून ७ मे रोजी महोत्सवाची सांगता होणार आहे.

रोज पहाटे ४ वा.काकडा भजन, विष्णू सहस्त्रनाम, सकाळी ७ वा. ज्ञानेश्वरी पारायण, संध्या.६.३० वा. हरिकीर्तन होईल. दि.३० एप्रिल रोजी ह.भ.प जगन्नाथ महारज पाटील भिवंडी यांचे कीर्तन, १ मे- ह.भ.प. साध्वी सोनालीदिदी करपे, २ मे- ह.भ.प. रामकृष्ण महाराज लहवितकर, ३ मे- ह.भ.प. अक्रूर महाराज साखरे, ४ मे- ह.भ.प. सोपान महाराज सानप शास्त्री, ५ मे- ह.भ.प. रुपालीताई सवने, ६ मे- ह.भ.प. महंत स्वामी श्री प्रकाशानंदगिरी महाराज, दि. ७ मे रोजी ह.भ.प. महंत रामगिरी महाराज [श्रीक्षेत्र गोदाधाम] यांचे काल्याचे कीर्तन व सायंकाळी ४ वा. महंत रामगिरी महाराज यांची भव्य रथयात्रा मिरवणूक व महाप्रसाद होणार आहे. व्यासपीठ चालक ह.भ.प. माउली महाराज गुंजाळ राहतील. या महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ, उंदीरगाव यांनी केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button