५ एप्रिलपासून शास्त्रोक्त नर्मदा परिक्रमा सहल
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : श्री योगीराज गंगागिरीजी महाराज ट्राव्हल्स उंदीरगाव यात्रा कमिटीच्या वतीने दि. ५ एप्रिलपासून शास्त्रोक्त नर्मदा परिक्रमासाठी भाविकांच्या प्रवासाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी चेअरमन सुरेश गलांडे पाटील यांनी दिली.
या १४ दिवसाच्या प्रवासात ओंकारेश्वर, प्रकाशा, शुलपानेश्वर, विमलेश्वर, निलकंठेश्वर, मिठीतलाई, नरेश्वर, कुबेर[कर्नाली], गरुडेश्वर, महेश्वर, उज्जैन, नेमावर, भेदा घाट, अमरकंटक, जालेश्वर, अमरेश्वर, महाराजपूर, हौशगाबाद अशी धार्मिक, प्रेक्षणीय स्थळे पहावयास मिळतील.
प्रवासाची सुरुवात नेहमीप्रमाणे उंदीरगाव येथून होणार आहे. तरी इच्छुक भाविकांनी नाव नोंदणीसाठी सुरश पा.गलांडे मो.क्र ९३२६६११२३८, बाबासाहेब काळे ९८२२६०६६९०, दिलीपराव नाईक ७५८८००५४०७, राजेंद्र गिर्हे ९५०३५४६४५५, सुरेश शिंदे ८६६८३९३६८० यावर संपर्क करावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.