धार्मिक

शिरसगाव येथे श्रीक्षेत्र कोपरगाव बेट ते श्रीक्षेत्र कानिफनाथ मढी दिंडीचे स्वागत

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील शिरसगाव विठ्ठल मंदिर येथे श्रीक्षेत्र कोपरगाव बेट ते श्रीक्षेत्र कानिफनाथ मढी भव्य पायी दिंडी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. त्यावेळी भजन कीर्तन झाले. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने यात्रेकरूंना स्नेह भोजन देण्यात आले.

या प्रसंगी आरोग्य विभागाच्या वतीने सर्व वारकर्यांची तपासणी करून औषधे देण्यात आली. तसेच श्रीक्षेत्र अंजनापूर ते श्रीक्षेत्र पैठण २४ मार्च ते १ एप्रिल पायी दिंडीचे आगमन व स्वागत करण्यात आले. यावेळी मठाधिपती प.पु. रमेशगिरीजी महाराज यांचे ग्रामस्थांच्या वतीने गणेशराव मुदगुले, सरपंच राणीताई संदीप वाघमारे, उपसरपंच संजय यादव, ग्रा.प.सदस्य सुरेश मुदगुले, कडू पवार, माणिक यादव, केदार यादव, ज्ञानदेव बकाल, लक्ष्मणराव यादव आदींनी स्वागत केले. पुढे श्रीक्षेत्र कानिफनाथ मढी कडे दिंडीचे प्रस्थान झाले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button