ठळक बातम्या

मराठा प्रतिष्ठान भवन हे श्रीरामपूर नगरीचे वैभव वाढविणारे-महंत भास्करगिरी महाराज

श्रीरामपूर/बाबासाहेब चेडे : कोणतेही सार्वजनिक काम असले तरी ते गावच्या नगरीचे वैभव वाढवणारे असते. आज सर्व पक्षाचे नेते आहेत. सर्व पक्ष सर्व जाती मिळून गावाचे वैभव वाढवायचे असते. पक्ष पक्षाच्या ठिकाणी व जात जातीच्या ठिकाणी असते. ही संतांची भूमी आहे. ज्या ज्या वेळी राजे महाराजे हतबल झाले त्यावेळी संतानी समाजाला सुविचार दिले. आपली संस्कृती आपले संस्कार टिकवून देशाचे वैभव अबाधित ठेवले. जेथे कमी तेथे आम्ही असे सत्ताधीशांचे कर्तव्य आहे. येथे जात कुठलीच नाही, सर्व जाती, धर्म, पंथ हे विचार प्रणाली आहेत. या मार्गाने जाणारी माणसे आहेत. सर्वांच्या अंत:करणात माणुसकी निर्माण करणे व माणसाने माणसाला साथ देऊन माणसासारखे जगणे. त्यासाठी सर्व जातीतील धर्माचार्याने महान कार्य केले आहे. आपल्याला प्रथम देशहित नंतर पक्षहित, कार्य करणे आहे, जे जे जाती धर्माचे माणसे राहतात, त्यांना गुण्या गोविंदाने नांदवणे हे वरिष्ठांचे काम आहे. देशात मंदिरे आहेत, मंदिरात देश नाहीत, म्हणून देश सुरक्षित ठेवणे, देशाची सर्व सुविधा कायम ठेवणे, ती सर्व पक्षाची, धर्मपंथाची जबाबदारी आहे, आपन भारत मातेची लेकरे आहोत. जे जे काम राहील त्यावेळी एकत्र आले पाहिजे. हे प्रतिष्ठान विशिष्ट जातीसाठी नसून समाजासाठी नसून इतरांच्या सुखासाठी आहे हे लक्षात घेतले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना बरोबर घेऊन कर्तव्य बजावले. ह्या प्रतिष्ठानचे काम लवकर होत राहो, ज्यांनी जागा दिली त्यांचे अभिनंदन करतो. श्रीरामपूर नगरी आपल्या हातून अधिकाधिक सर्व प्रकारांनी चांगली व्हावी ही प्रभू चरणी प्रार्थना करतो असे प्रतिपादन श्रीक्षेत्र देवगड मठाधिपती श्री दत्त देवस्थान प.पु गुरुवर्य ह.भ.प. भास्करगिरी महाराज यांनी श्रीरामपूर थत्ते मैदान जवळ झालेल्या मराठा प्रतिष्ठान भवनच्या भूमिपूजन प्रसंगी केले.
प्रारंभी भागवत लासुरे यांनी स्वागतपर भाषण केले. संस्थापक विलासराव जाधव यांनी पाहुण्यांचे प्रास्तविक करताना संस्थेच्या माध्यमातून घेतलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली व ते म्हणाले की बऱ्याच दिवसानंतर आपले सर्वांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. मराठा प्रतिष्ठानला एक हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. प्रतिष्ठान हे चांगले काम करीत आलेले आहे. चांगल्या विचारांची पेरणी करीत आहे. आज ज्यांच्यामुळे हा योग घडून आला ते स्व.यादवमामा लबडे यांची आज आठवण झाली. वर्षापूर्वी मला विचारले की जागेचे काम झाले का? मी नाही म्हणालो व त्यांनी एक वर्षात या जागेला यादवमामा यांनी होकार दिला. मनोज लबडे, राजेंद्र आदिक यांचे मोठे सहकार्य झाले.

आज भूमिपूजन झाले. सर्वांची साथ असून श्रीरामपूर नगरपालिका आदींनी सुद्धा मोठे सहकार्य या कामी केले. मराठा समाज बहुउद्देशीय विकास सेवा प्रतिष्ठान अंतर्गत विविध संस्था स्थापन केल्या आहेत ५५ गावात, तीन तालुक्यात संस्थेचे जोमाने काम चालू आहे. अडीच वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार कार्य दररोज ५२२२ लोकांपर्यंत पोहोच केले जाते. तों वर्षात १७६१ विवाह या वधूवर सूचक मंडळाकडून झाले आहेत. चार वर्षापासून गुणवंतांचा गौरव करीत आहोत. दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची निघणारी महाराष्ट्रातील शिस्तबद्ध मिरवणुकीची दखल प्रशासनाने घेतली आहे. रक्तदान शिबिरे घेतली जातात. गावागावत समित्या स्थापन करणार आहोत. या ठिकाणी लवकरच आरोग्य शिबीर आयोजित करीत आहोत.

नगराध्यक्षा अनुराधा आदिक म्हणाल्या की हे कार्य माझ्या काळात होत आहे त्याचा मला अभीमान आहे. माझ्या निवडणुकीत एक मराठा लाख मराठा ह्या घोषवाक्यामुळे मला हे पद मिळाले. माझ्यावर जी जबाबदारी दिली जाईल ती पूर्ण करीन, ध्येय फौंडेशनच्या या कार्याला खूप शुभेच्छा.. उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी सांगतिले की या कामी नगरपालिकेत हा ठराव आला. त्याला सर्वांचा पाठींबा मिळून ५ मिनिटात मंजूर केला. श्रीरामपूरच्या जडणघडण मध्ये मराठा समाजाचे फार मोठे योगदान आहे. साई संस्थान विश्वस्त सचिन गुजर, सभापती संगीता शिंदे, जी.प.सदस्य शरद नवले, कैलास बोर्डे, जिजामाता तरुण मंडळचे संजय छल्लारे, डॉ रवींद्र कुटे आदींनी शुभेच्छा दिल्या.
माजी आ.भाऊसाहेब कांबळे यावेळी म्हणाले की नगरपालिकेने या समाजासाठी व सर्वांसाठी जागा दिल्या आहेत. आजची जागा आहे भविष्यासाठी त्यापेक्षा अजून मोठी जागा या प्रतिष्ठानला देण्याचे काम नगराध्यक्षा यांनी करावे, मराठा समाज हा सर्वाना बरोबर घेऊन जाणारा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने महाराष्ट्र घडलेला आहे. शाहू महाराज, महात्मा फुले, आदीनी महाराष्ट्र घडविला आहे. हा वारसा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. खा सदाशिव लोखंडे यांनी यावेळी सांगितले की या संस्थेचे कार्य गौरवास्पद आहे. या संस्थेस भरीव आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले. सचिन गुजर यांनी सांगितले की आमदार लहू कानडे यांच्या माध्यमातून भरीव आर्थीक सहाय्य दिले जाईल.
याप्रसंगी ऋषीकेश डावखर, दिलीप काळे, विधिज्ञ अरुण लबडे, विठ्ठलराव पवार, संजय टेकाळे, रवींद्र पवार, संजय छल्लारे, सिद्धी विनायक कलर वर्ल्ड, दीपक कोळसे, दीपक निंबाळकर, उंडे पा.अग्रो, आशीश धनवटे, अनुराधाताई आदिक, धनंजय पवार, विधिज्ञ प्रमोद वल्टे, सुनील चोथे, खा सदाशिव लोखंडे, डॉ अरविंद बडाख, बाबासाहेब मोरगे आदींनी भवनास देणग्या दिल्या.
यावेळी मराठा स.बहुउद्देशीय विकास सेवा प्रतिष्ठान संस्थापक विलासराव जाधव, अध्यक्ष भागवतराव लासुरे, उपाध्यक्ष किशोर निर्मळ, उपाध्यक्षा सीमा जाधव, सचिव रावसाहेब तोडमल, सहसचिव लक्ष्मीकांत शिंदे, खजिनदार शहाजी चेडे, विश्वस्त राजेंद्र मोरगे, सुरेश कांगुणे, रमेश नवले, डॉ अरविंद बडाख, संजय टेकाळे, विठ्ठलराव पवार, अर्जुनराव भांड, जयश्री नवले, डॉ स्वाती चव्हाण, वधूवर सूचक मंडळ अध्यक्ष सुरेश कांगुणे, अजय बोडे, स्वप्नील लांडे, संदीप चोरगे, अर्जुन खरात, वसंतराव मुठे, लतिका गागरे, मयुर निंबाळकर, ज्योती ठोकळ, ज्योती निंबाळकर, महिला समिती, मराठा युवा प्रतिष्ठान संतोष ठोकळ, ऋषिकेश मोरगे, तुषार पवार, अविनाश पटारे, अमोल जैत, आकाश मोरगे, स्वप्नील जाधव, प्रफुल्ल पवार, राजदीप जाधव, आकाश मोरगे, योगेश मरकड, बबलू आढाव, रवींद्र पाटील, आकाश सोनावणे, पंडितराव बोंबले, नितीन बनकर, भाऊसाहेब चौधरी, गंगाधर चौधरी, प्रकाश निकम, अशोक थोरे, गणेश मुद्गुले, अरुण नाईक, अभिषेक खंडागळे, डॉ लबडे, रितेश रोटे, वसंतराव शेळके, सिद्धार्थ मुरकुटे, एकनाथ कापसे, दीपकराव कडू आदी उपस्थित होते. सूत्र संचालन व आभार प्रदर्शन संतोष मते यांनी केले.

Related Articles

Back to top button