अहमदनगर

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या वतीने दिव्यांगांना फराळ वाटप

चिंचोली/बाळकृष्ण भोसले : शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष, राहुरी तालुका, मातोश्री मीनाताई ठाकरे महिला औद्योगिक सहकारी संस्था, आनंद तरंग संगीत कला सांस्कृतिक मंडळ, राहुरी व शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे तालुकाप्रमुख गंगाधर सांगळे पाटील यांच्या संकल्पनेतून एक सामाजिक बांधिलकीचे भान ठेऊन राहुरी तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना दिवाळी निमित्त फराळ व फळे वाटप करून त्यांची दिवाळी गोड करण्यात आली.
राहुरी येथील संत गाडगेबाबा आश्रम शाळेच्या सभागृहात योगेश घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. यावेळी गंगाधर सांगळे पाटील म्हणाले की शिवसेना नेहमीच समाजात काम करताना ८०% समाजकारण व २०% राजकारण हि स्व. बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण डोळ्यासमोर ठेऊन समाजातील उपेक्षित घटकांना नेहमी मदत करण्याची धडपड करत असते.
कोरोना महामारीमुळे तालुक्यातील दिव्यांग घटकांना अनेक आर्थिक संकटांना व अडचणींना सामोरे जावे लागले याची जाणीव ठेऊन त्यांची दिवाळी गोड करण्याच्या हेतूने फराळ व फळे वाटप करून त्यांना मानसिक आधार देण्याचा छोटासा प्रयत्न केला. तालुक्यातील दिव्यांगांच्या भविष्यातील कोणत्याही अडचणी थेट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांना थेट भेटून समस्या सोडविण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली.
यावेळी आनंद तरंग संगीत कला सांस्कृतिक मंडळाचे संचालक बबन साळवे यांनी आपल्या मधुर आवाजातून सदाबहार गिते सादर करून उपस्थिताना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमात दिव्यांग महिला तसेच पुरुष यांची उपस्थिती लक्षनीय होती. प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हा समन्वयक अप्पासाहेब ढोकणे, तालुकाध्यक्ष मधुकर घाडगे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच दिव्यांग महिलांच्या वतीने अनामिका हारेल यांनी आपल्या समस्या मांडल्या.
यावेळी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे राजूभाऊ म्हसे, कृष्णा पोपळघट, बाळासाहेब पवार, विकास काशिद, नारायण तनपुरे, गणेश उर्फ राजू खांदवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Back to top button