अहमदनगर

महात्मा गांधी जयंती निमित्त देवळालीत मोफत ७/१२ वितरण सोहळा संपन्न

देवळाली प्रवरादेशाच्या अमृतमहोत्सवी वर्षा निमित्ताने महात्मा गांधी जयंती दिनी देवळाली प्रवरा येथे मोफत संगणकीकृत ७/१२ वितरण सोहळा संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार आणि महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून व निर्णयानुसार आज दि ०२ ऑक्टोबर २१ महात्मा गांधी जयंती दिनी देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने देवळाली प्रवरा नगरपालिका सभागृह येथे महात्मा गांधी व पंडित लालबहादूर शास्त्री यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मोफत संगणकीकृत ७/१२ वितरण करण्यात आले. त्या प्रसंगी देवळाली प्रवरा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चोथे, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, नगरसेवक सचिन ढुस, बाळासाहेब खुरुद, संगीता चव्हाण, सुजाता कदम, संजय बर्डे, आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, सुनील कराळे, प्रशांत कराळे, कुमार भिंगारे, अमोल कदम, भिमराज मुसमाडे, रवींद्र मुसमाडे, भारत शेटे, रवींद्र दळवी, तलाठी दीपक साळवे, तरन्नुम शेख आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी तलाठी दीपक साळवे यांनी खाते उताऱ्यांचं वाचन करून वर्षभरात विनातक्रार फेरफार नोंदीची माहिती दिली. सुधारित ७/१२ च्या नमुन्यातील बदलांची माहिती, १५ ऑगस्ट २१ पासून सुरू झालेल्या ई पीक पाहणी प्रकल्पाच्या उपयुक्तता बाबत माहिती आणि महसूल विभागाच्या इतर ऑनलाइन सुविधे बाबत माहिती देऊन संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरीत सुधारित ७/१२ उपलब्ध करून देणेबाबत विशेष मोहिमेचा सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

Related Articles

Back to top button