अहमदनगर

महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या परिसरातील अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था

राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी : महात्मा फुले कृषि विद्यापीठातील अंतर्गत रस्त्याची दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. अपघाताला आमत्रंण देणाऱ्या या रस्त्यावरील खड्डे त्वरीत भरावे, अशी मागणी होत आहे.


विद्यापीठातील प्रवेश द्वार ते स्टेट बँक, मेन बेल्डींग ते गँरेज, तसेच काँलनीतील रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असुन दरम्यान च्या गेल्या तीन ते चार वर्षांपासून एकदाही काम करण्यात आले नाही. त्यामुळे रस्त्यावर खड्ड्यांचे जाळे निर्माण झाले आहे. त्यातच रस्त्याच्या दोन्हीही बाजूला गवत वाढल्याने डासाचे प्रमाण वाढल्याने रोगराई वाढत आहे. तसेच बांधकाम विभागाच्या अधिका-यांच्या आदेशाने रस्तावर मोठमोठे गतीरोधक टाकण्यात आले. त्यामुळे कित्येक नागरिकांना मणक्याचे व पाठीचे आजार झाले असुन काही दुचाकीस्वार तर गतिरोधक मध्ये पडले असुन दुखापत झाली आहे. तसेच रस्त्यावर साचणार पाऊसाचे पाणीही मोठया प्रमाणात रस्त्यावर साचत असुन पाणी जाण्यासाठी कुठलीही व्यवस्था करण्यात आली नसुन रस्त्यावरच जागोजागी लोखंडी बँरगेट आडावे लावण्यात आले आहे. त्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवण्यास त्रास होत आहे.

विद्यापीठातील प्रक्षेत्रावरील रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली असुन विद्यापीठाचे कार्यक्षेत्रातील सगळेच रस्ते खराब झाले आहेत. विद्यापीठाचे कुलगुरु यांनी त्वरीत याकडे लक्ष दयावे अशी विद्यापीठातील कर्मचारी, प्रकल्पग्रस्त नागरीकांची व वाहनचालकांची मागणी आहे. हे रस्ते मृत्यूचा सापळा बनले आहे. या रस्त्यांच्या दुरुस्ती चे काम त्वरीत करावे अशी मागणी होत आहे.

Related Articles

Back to top button