अहमदनगर

श्रीरामपूर बाजार समितीच्या कामकाजाचे नाशिक विभागाच्या विभागीय सहनिबंधकांकडून कौतुक

नाशिक विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नाशिक विभाग विलास गावडे व सहाय्यक निबंधक संदीपकुमार रुद्राक्ष यांचा सत्कार करताना प्र.सचिव साहेबराव वाबळे व समवेत उपस्थित कर्मचारी वर्ग. ( फोटो – संदिप आसने )

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेऊन बाजार समितीच्या कामकाजाची नाशिक विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नाशिक विभाग विलास गावडे यांनी कौतुक केले.

श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला नाशिकचे विभागीय सहनिबंधक विलास गावडे यांनी काल अचानक भेट देऊन बाजार समितीच्या कांदा विभाग, भाजपाला विभाग, भुसार विभाग, पेट्रोल पंप, मोकळा कांदा मार्केट तसेच उप बाजाराच्या कामकाजाची पाहणी करत प्रशासकीय कामकाजाचे कौतुक केले. श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रभारी सचिव साहेबराव वाबळे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन नाशिक विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नाशिक विभाग विलास गावडे यांचे स्वागत करण्यात आले. तसेच श्रीरामपूरचे सहाय्यक निबंधक संदीपकुमार रुद्राक्ष यांचे पर्यवेक्षक संजय सरोदे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे प्रथमच नाशिक विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नाशिक विभाग विलास गावडे यांनी काल अचानक सदिच्छा भेट दिली यावेळी बाजार समितीच्या सन २०२२-२३ या वर्षात ८२ लाखांचा वाढावा मिळाल्याबद्दल त्यांनी प्रशासक दीपक नागरगोजे आणि प्रभारी सचिव साहेबराव वाबळे यांचे कौतुक केले. तसेच पुन्हा बाजार समितीला सदिच्छा भेट देणार असल्याचे सूतोवाच केले. तसेच नूतन संचालक मंडळाला शुभेच्छा दिल्या.

यावेळी व्यापारी संचालक जितेंद्र गदिया, बाजार समितीचे अजय कासार, संजय सरोदे, दत्तात्रय थोरात, वामन मोरगे, अक्षय पोलादे, सौ माधुरी कांबळे, पुष्पा देवकर, भीमराज मनाळ, आण्णासाहेब मुंजाळ, मनोज मुंडे, सचिन थोरात, विजय तुपे, विनोद कचरे, चंद्रकांत साळुंके, संदीप आसने, आकाश आहेर आदी उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button