ठळक बातम्या

इपीएस ९५ पेन्शनवाढ प्रश्न लोकसभेत प्राधान्याने मांडणार- खा.वाकचौरे

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : इपीएस ९५ पेन्शनर्स यांचा प्रलंबित प्रश्न प्राधान्याने लोकसभेत मांडणार तसेच याबाबत कामगार मंत्री, अर्थमंत्री यांना निवेदन देऊन पाठपुरावा करणार असल्याचे शिर्डीचे नूतन खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी रविवारी पालखी निवारा शिर्डी येथे झालेल्या राज्यस्तरीय पेन्शनर्स मेळाव्यात प्रतिपादन केले.

केंद्राकडे सदार करण्यात येणारा मसुदा मेळाव्यात सर्वांसमोर वाचून दाखविण्यात आला व मेळाव्यातून लगेच नवी दिल्ली येथे रवाना झाले. आज शिर्डी येथे महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांचे चिंतन शिबीर पार पडले. त्यास महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि या शिबिरात सर्वांग विचार करण्यात आला. संघटनेच्या पुढील दिशेचा आढावा घेण्यात आला.

येत्या २९ व ३० जुलै रोजी दिल्लीला राष्ट्रीय संघर्ष समितीची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होईल व ३१ जुलै या तारखेला दिल्ली येथे जंतर मंतर येथे ध्यानाकर्षण आंदोलन होईल, म्हणजे कोणाच्या विरोधात नसेल. आपल्या प्रश्नावर केंद्र सरकारचे ध्यान आकर्षित व्हावे हा उद्देश राहील. त्यामुळे या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत, महासचिव विरेंद्रसिंग राजावत यांनी केले.

तसेच आज या मेळाव्यासाठी खा. भाऊसाहेब वाकचौरे प्रमुख अतिथी होते. त्यांनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन करून तुमचा प्रश्न प्रकर्षाने संसदेत मांडीन असे जाहीर केले. त्यामुळे पेन्शनर्स यांना अतिशय विश्वास खा. वाकचौरेमुळे निर्माण झाला आहे व आनंदी झाले आहेत. सूत्र संचालन पश्चिम भारत संघटक सुभाष पोखरकर व महाराष्ट्र अध्यक्ष आंबेकर यांनी केले. यावेळी सर्व पदाधिकार्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button