अहमदनगर

राहुरी शहर व्यापारी असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर

राहुरी : राहुरी शहर व्यापारी असोसिएशनची कोअर कमिटी सदस्यांची बैठक व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाशशेठ पारख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत राहुरी शहर व्यापारी असोसिएशनची नवीन कार्यकारिणी सदस्यांची निवड करण्यात आली.

सदर बैठकीत शहर कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी कांता तनपुरे, अनिल कासार, सचिवपदी अनिल भट्टड, सहसचिवपदी संतोष लोढा, कोषाध्यक्षपदी संजीव उंदावत, मिडीयाप्रसिद्धी प्रमुखपदी देवेंद्र लांबे आदींची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी कोअर कमिटी सदस्य माजी नगरसेवक सुर्यकांत भुजाडी, नंदकिशोर भट्टड, बाळासाहेब उंडे, संतोष आंळदे, प्रवीण दरक, नवनीत दरक, प्रवीण ठोकळे, अख्तर काद्री, एकनाथ खेडेकर, मोहन जोरी, दिपक मुथ्था, गणेश नेहे, विलासराव तरवडे आदी कोअर कमिटी सदस्य उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button