अहमदनगर

गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त सभासदांचा सन्मान करणं हा स्तुत्य उपक्रम – अनुराधाताई आदिक

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : आपल्या पतसंस्थेच्या वतीने गुणवंत पाल्याला भविष्याचा वेध घेण्यासाठी हा घरचा सन्मान पुरेसा असून याच्याच जोरावर हे विद्यार्थी भविष्यात चांगल्या क्षेत्रात नावलौकिक मिळवून आपल्या आईवडिलांचे, शाळेचे, संस्थेचे व गावाचे नाव मोठे करतात असे गौरवोद्गार काढले. संस्थेतुन सेवानिवृत्त झालेल्या सभासदांनी यापुढेही संस्थेच्या हितासाठी मार्गदर्शन करावे ही अपेक्षा नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी व्यक्त केली.

खा.गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्था सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या वतीने गुरुवार दि.२१ मार्च रोजी काँग्रेस भवन श्रीरामपूर येथे विविध क्षेत्रात नैपुण्य मिळविणाऱ्या सभासद पाल्यांचा व मातृ संस्थेतून सेवानिवृत्त झालेल्या सभासदांचा कृतज्ञता सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीरामपूर नगरपालिकेच्या प्रथम लोकनियुक्त माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक होत्या.

यावेळी संस्थेचे सहसचिव जयंत चौधरी यांनी पतसंस्थेचा कारभार अतिशय पारदर्शक व उत्तम सुरू असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. साखर कामगार फेडरेशनचे अध्यक्ष व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य नितीन पवार यांनी पतसंस्थेच्या माध्यमातून सभासदांच्या हितासाठी राबवत असलेल्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी गव्हर्निंग कौन्सिल सदस्य सुनील थोरात, पतसंस्थेचे संचालक बाळासाहेब वमने, संजय शिंदे, विजय थोरात, विलास कुलकर्णी, संदीप बोरूडे, मुद्दसिर सय्यद, नवनाथ बर्डे, सुभाष पटारे, सौ. संगीता घोडे, संस्थेचे मॅनेजर संतोष दांडगे, कर्मचारी संभाजी जाधव, सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेअरमन शामराव तऱ्हाळ यांनी केले. अध्यक्ष सूचना प्राचार्य सुभाष काळे यांनी मांडली. त्यास बाळासाहेब बनकर यांनी अनुमोदन दिले, शेवटी व्हा. चेअरमन मंदाकिनी खाजेकर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अशोक कटारे व विष्णू राऊत यांनी केले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button