कृषी
महात्मा फुले कृषि विद्यापीठात बांबु तोडणी प्रशिक्षण संपन्न
राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प, अवर्षण प्रवण उपकेंद्र (वनशेती) यांच्या प्रक्षेत्रावर मुंबई येथील महाराष्ट्र बांबु प्रवर्तन प्रतिष्ठानच्या सहकार्याने तीन दिवसीय बांबु तोडणी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन कृषिविद्या विभाग प्रमुख डॉ. आनंद सोळंके यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय कृषि संंशोधन प्रकल्प, अवर्षण प्रवण उपकेंद्र (वनशेती)चे प्रभारी अधिकारी डॉ. बी.टी. सिनारे, डॉ. एस.एस. दिघे व प्रा. व्ही.एस. भारमल उपस्थित होते. या प्रशिक्षण कार्यक्रमात मुंबई येथील महाराष्ट्र बांबु प्रवर्तन प्रतिष्ठानचे दिनेश साळुंके यांनी बांबु तोडणी, बांबु साळणी, काठ्या तयार करणे व बांबुचे गठ्ठे बांधणे याबाबत कामगारांना सविस्तर प्रशिक्षण दिले.