अहमदनगर

केशव गोविंद बन प्रा. शाळेस उत्कृष्ट परसबाग स्पर्धेत प्रथम बक्षीस

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : नगर जिल्हा परिषद, प्राथमिक शिक्षण विभागाच्या मार्फत सन 2023 – 24 या शैक्षणिक वर्षात प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शालेय स्तरावर ‘उत्कृष्ट परसबाग’ ही स्पर्धा राबविण्यात आली. त्यात तालुका, जिल्हा स्तरावर मोठ्या प्रमाणावर बक्षीसांचे नियोजन होते.

त्यानुसार गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती यांनी तालुकास्तरीय समितीमार्फत तालुक्यातील शाळांच्या परसबागांचे मूल्यांकन करून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या व प्रोत्साहनपर शाळांचा अहवाल जिल्हा समितीस सादर केला. या स्पर्धेत तालुका स्तरावर केशव गोविंद बन प्राथमिक शाळा, बेलापूर खुर्दचा प्रथम क्रमांक आला आणि 5000 रुपयांचे बक्षीस मिळवून शाळा जिल्हास्तर मूल्यांकनासाठी पात्र ठरली. नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय मूल्यांकनामध्येही शाळेने प्रोत्साहनपर बक्षीस रुपये 2000 मिळवले.

या उपक्रमासाठी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा शिक्षण अधिकारी भास्कर पाटील, श्रीरामपूर पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी श्रीम. सामलेटी, विस्ताराधिकारी दिवे, केंद्रप्रमुख विटनोर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. शाळेच्या या यशाबद्दल सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, समस्त ग्रामस्थ आणि पालक बंधू – भगिनींनी विद्यालयाचे मुख्याध्यापक जटाड तसेच शिक्षक खरात, पवार, सय्यद, श्रीम. जाधव, श्रीम. वाकचौरे यांचे अभिनंदन केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button