गोटुंबे आखाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात संपन्न
राहुरी : तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथे दि. 6 मार्च 2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमास इयत्ता 1 ली ते 7 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने भारावून गेलेल्या पालक व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली. जिल्हाभरातील शिक्षकांनी, ग्रामस्थांनी व तरुण मंडळांनी बक्षीसांचा वर्षाव केला.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर, धार्मिक, विनोदी गीतांवर बहारदार नृत्य सादर केले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना तसेच वार्षिक सर्वोत्कृष्ट विद्यार्थी आदित्य पडवळकर व मिताली शिंदे यांना पारितोषिक देण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरिक्षक शरद गायमुखे, गटशिक्षणाधिकारी मोहिनीराज तुंबारे, विस्तार अधिकारी रविंद्र थोरात, केंद्रप्रमुख श्रीमती शेटे मॅडम तसेच विषय तज्ञ श्री. उजगरे, श्री. तांदळे, श्री.खेमनर आदींनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. तसेच जिल्हाभरातून विविध शिक्षक संघटनेचे मान्यवर पदाधिकारी व बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते.
यावेळी सरपंच मालतीताई साखरे, उपसरपंच तुकाराम बाचकर, ग्रामविकास अधिकारी प्रभाकर चव्हाण, ग्रामपंचायत सदस्या मीनाताई घोकसे, प्राजक्ताताई शेटे, अश्विनीताई कुमावत, मनीषा शेंडे, सदस्य शिवाजी पवार, दिपक शेडगे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब दाभाडे, सदस्या राजश्री पटारे, विजया दिपक ढोणे, छोट्या शिंदे, अरुणा पटारे, बिलालभाई शेख, अक्षय डहाळे, गणेश शेंडे, दिपक नगरे, शाम कोळेकर, गणेश रहाणे, चांद पठाण, सचिन सोळशे, मनोज घोकसे, बापूसाहेब होडगर, अंकुश दवणे, सोन्याबापू बाचकर, किरण खेमनर, राजन सुसे, सखाराम बाचकर आदींसह ग्रामस्थ व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका जपकर मॅडम, कमळापुरकर मॅडम, मोरे मॅडम, कल्हापुरे मॅडम, निमसे मॅडम, कांबळे मॅडम, साळवे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांना नृत्य शिकविण्यासाठी पूजा, श्रद्धा व दिपाली व सर्व महिला शिक्षिकांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका जपकर मॅडम यांनी केले. सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी महादेववस्ती शाळेचे शिक्षक श्री.पंडीत व विद्या मंदीर प्रशालेचे श्री.रासकर यांचे विशेष सहाय्य लाभले. या कार्यक्रमासाठी मंडप आणि डेकोरेशन बिलालभाई यांचे सहकार्य लाभले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम.गायकवाड मॅडम व अनिल पवार यांनी तर आभार श्री. रासकर यांनी मानले.