अहमदनगर

म्हैसगांव येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

राहुरी | जावेद शेख : तालुक्यातील म्हैसगांव येथे जागतिक महिला दिन व गुणगौरव सन्मान सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. लोकनियुक्त सरपंच सौ. सुजता अरुण पवार, उपसरपंच शशिकांत गागरे, ग्रामसेवक एच बी पारधे यांनी सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन तसेच नियोजन केले.

यावेळी म्हैसगांव श्री केदारेश्वर देवस्थानचे ह.भ.प. पांचाळ महाराज हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते म्हैसगांव येथिल सर्व क्षेत्रातील उत्कृष्ठ कामागिरी पार पडणाऱ्या महिलांचा गुणगौरव समारंभ संपन्न झाला. यावेळी सरपंच सुजाता पवार व अध्यक्ष आशा तुकाराम नेहे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ग्रामपंचायत कडून या सर्व महिलांचा शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी माजी महिला सरपंच सौ. रुपाली दुधाट, सदस्य भिमा दुधाट, सी.आर.पी. स्नेहा रविंद्र गोसावी, नम्रता नंदकुमार कुटे, ग्रामसंघ अध्यक्ष सौ आशा तुकाराम नेहे, संगिता गोरख आग्रे तसेच सर्व बचत गटांचे अध्यक्ष, सचिव, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य विभागाच्या आशा सेविका, सोसायटी सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी व मोठ्या संख्येने महिला, ग्रामस्थ उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button