अहमदनगर

शेतकऱ्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कदम यांनी प्रयत्न करावेत – मा.आ. कर्डिले

राहुरी – देवळाली प्रवरा येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब कदम यांना शेतकरी सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष धनंजय जाधव यांच्या आदेशाने शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख रामभाऊ रहाणे यांनी शिवसेना प्रणित शेतकरी सेना राहुरी तालुका प्रमुख म्हणून निवड केली आहे.

निवडीनंतर जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांनी बाळासाहेब कदम यांचा सत्कार केला. या प्रसंगी शिवसेना राहुरी तालुका प्रमुख देवेंद्र लांबे, तालुका संपर्क प्रमुख अशोक तनपुरे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष विनीत धसाळ, शिवसेना जेष्ठ नेते वसंत कदम, जालिंदर मुसमाडे, रोहित नालकर, प्रशांत खळेकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

या प्रसंगी मा. आ. कर्डिले म्हणाले की, शेतकरी हा समाज जीवनातील मुख्य घटक आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्यनेते ना.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व ना.अजित पवार यांनी अनेक शेतकरी हिताचे निर्णय घेतलेले आहेत. शासनाकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. परंतु सर्व सामान्य शेतकऱ्यांपर्यंत या योजना पोहचत नसल्याने योजनेचा फायदा मिळत नाही.

शासकीय योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी शेतकरी सेनेचे नवनियुक्त राहुरी तालुका प्रमुख बाळासाहेब कदम यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. राहुरी मतदार संघात शासकीय योजना राबविताना अडचण भासल्यास सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन मा.आ. शिवाजीराव कर्डिले दिले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button