धार्मिक

सात्रळ पंचक्रोशीत श्री संत शिरोमणी नरहरी महाराजांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

राहुरी : तालुक्यातील सात्रळ, सोनगाव, धानोरे पंचक्रोशीतील सुवर्णकार समाजाकडून श्री संत शिरोमणी नरहरी महाराजांची 738 वी पुण्यतिथी मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.

भल्या सकाळी नरहरी महाराजांच्या मूर्ती अभिषेक तसेच पूजन येथील सुवर्णकार समाजातील जेष्ठ तुकारामशेट सोनार यांच्या हस्ते पार पडला. त्यानंतर परिसरातील भजनी मंडळ तसेच समाज बांधवांच्या सहभागाने टाळ मृदूंगाच्या गजरात संत शिरोमणी नरहरी महाराजांच्या प्रतिमेची साजविलेल्या ट्रॅक्टर मधून भव्य दिव्य अशी मिरवणूक पंचक्रोशीतील मुख्य रस्त्यावर काढण्यात आली.

श्री संत शिरोमणी नरहरी महाराजांच्या प्रतिमा असलेली मिरवणूकीचे जागोजागी पूजन करण्यात आले. यानंतर संत नरहरी महाराज मंदिरासमोरील शामियान्यात भक्तजनांनी हभप सुनिताताई कातोरे यांचा सुंदर असा संगीतमय प्रवचनाचा आस्वाद घेतला. पुण्यथिती कार्यक्रमाची सांगता महाप्रसाद घेऊन झाली.

यावेळी ग्रामस्थ, विविध संस्थांचे पदाधिकारी, प्रतिष्ठीत तसेच भक्तजन, सुवर्णकार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यथिती सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडण्यासाठी सुवर्णकार समाज बांधव प्रयत्नशील होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button