साहित्य व संस्कृती

गझल कार्यशाळा व कविसंमेलनाचे आयोजन

राहुरी | जावेद शेख : डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे प्रादेशिक कार्यालय नागपूर व काव्यप्रेमी शिक्षक मंच नागपूर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज आणि माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त गझल कार्यशाळा व कविसंमेलन 25 फेब्रुवारी 2024, रविवारी समाज न्याय भवन, समाज कल्याण विभाग ( डोम ) येथे संपन्न होणार असल्याची माहिती आयोजक काव्यप्रेमी शिक्षक मंच नागपूर जिल्हाध्यक्षा निशा खापरे यांनी दिली आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी ११ वा. बार्टी प्रादेशिक कार्यालय, नागपूर येथे समाजकल्याण विभागाचे उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांच्या हस्ते होणार असून, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण अधिकारी सुकेशीनी तेलगोटे, बार्टीचे स. प्रकल्प व्यवस्थापक अनिल वाळके आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमात गझल कार्यशाळेचे मार्गदर्शक कालिदास चवडेकर ( काव्यप्रेमी शिक्षक मंच राज्यसचिव) तथा अझीझ खान पठाण ( गझलकार नागपूर ) यांच्या उपस्थितीत ११:३० वा. ही कार्यशाळा घेण्यात येणार आहे.

यावेळी काव्यप्रेमी शिक्षक मंचचे राज्य सहसचिव दीपक सपकाळ उपस्थित राहणार आहेत. दुपारी अडीच वाजता कार्यक्रमाचे दुसरे सत्र कविसंमेलन डॉ स्मिता मेहेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून प्रमुख अतिथी म्हणून दैनिक बहुजन सौरभच्या संपादक संध्या राजूरकर आणि सामाजिक कार्यकर्त्या विजया धोटे असणार आहेत. या सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून काव्यप्रेमी शिक्षक मंचच्या विभागीय अध्यक्षा कविता कठाणे आणि उपाध्यक्ष नीरज आत्राम उपस्थित राहणार आहेत.

काव्यप्रेमी नागपूर जिल्हा कार्यकारी मंडळ रेखा सोनारे, प्रा. अपर्णा कल्लावार, अर्चना कोहळे, शितल बोढे, नंदकिशोर कदम, कोकिळा खोदनकर, सविता धमगाये, डॉ शील बागडे, सुधाकर भुरके, छाया पिंपळे, डॉ गीता वाळके, यांच्यासह 40 कवींचा या गझल कार्यशाळेत आणि कविसंमेलनात सहभाग असणार आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button