ठळक बातम्या

राहुरी पोलीस ठाणे व नगरपालिकेने वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी आखल्या पार्किंग लाईन

राहुरी | जावेद शेख : शहरातील बाजारपेठेत होणाऱ्या वारंवार ट्राफिक जामवर उपाययोजनांचा भाग म्हणून नागरिकांच्या व व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार पोलीस विभागाने नगरपालिकेकडे विनंती करून पार्किंग लाईन आखून घेतली आहे. यानंतर सदर पार्किंग रेषे बाहेर जे नागरिक वाहने लावतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई राहुरी पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात येणार आहे.

सर्व दुकानदार व्यापारी व्यावसायिक यांना याद्वारे आव्हान करण्यात येते की, आपल्या दुकानात येणाऱ्या ग्राहकाला सदर पार्किंग लाईनच्या आत मध्येच दुचाकी वाहने लावण्याची समज द्यावी. जेणेकरून विनाकारण होणारी ट्रॅफिक जाम टाळता येईल व येणाऱ्या ग्राहकांनाही विनाकारण दंडात्मक कारवाईला सामोरे जाण्याची वेळ येणार नाही. तसेच ग्राहकांच्या वाहनांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व दुकानदार व्यवसायिक यांनी आपल्या दुकानांसमोरचा एरिया सीसीटीव्ही मध्ये कव्हर होईल अशा अँगल मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे ज्यात वाहनाचा नंबर स्पष्ट दिसू शकेल अशा क्षमतेचे बसवावेत. जेणेकरून वाहन चोरीस प्रतिबंध होईल व वाहन चोरी गेल्यास त्याचा शोध घेण्यास पोलिसांना मदत होईल.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, विभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात नगरपालिका मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्या समन्वयातून सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण, एचसी अशोक शिंदे, विकास साळवे, रोहकले, गणेश लिपणे, शकुर सय्यद नगरपालिका स्वच्छ्ता निरीक्षक पवार यांच्या पथकाने केलेली आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button