राजकीय

प्रा. रामदास आडागळे यांची शिर्डी लोकसभेसाठी चाचपणी

राहुरी – लवकरच होत असलेल्या लोकसभा निवडणुकांसाठी विविध राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. त्यानुषंगाने ठराविक जणांना मतदार संघात जावून कामाला लागण्याचे आदेशही पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आले आहेत. याचाच भाग म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. रामदास आडागळे यांनी शिर्डी लोकसभा मतदार संघाचा झंझावती दौरा सुरू केला असून आपल्या सहकारी मित्रांच्या भेटीगाठी घेत गुप्तगू सुरू केले आहे.

प्रसंगी माध्यमांशी बोलताना प्रा. आडागळे म्हणाले की, माझी सर्वसामान्यांशी नेहमीच नाळ जोडली गेली असून शिर्डी मतदार संघाचे नाते माझे नवे नाही. लोकप्रतिनिधींचा सचिव म्हणून काम करताना विविध समाजघटकांचा नेहमीच संपर्क राहिला असून त्याचा फायदा आगामी काळात होणार असल्याचे सांगत लवकरच पत्रकार परिषद घेऊन माझी भुमिका स्पष्ट करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

युवा ग्रामीण पत्रकार संघाचे त्यांनी कौतुक करत मतदार संघात या पत्रकार संघाचे काम निश्चितपणे प्रेरणादायी असून तळागाळातील समाजघटकांप्रती निरपेक्ष भावनेने करत असलेले काम अविरत सुरू ठेवण्याचा मनोदय त्यांनी पदाधिकारी यांचेशी बोलून दाखविला. प्रसंगी त्यांच्यासमवेत सामाजिक कार्यकर्ते दिपक औताडे, पत्रकार अमोलराजे भोसले, शरदराव तांबे, बाळकृष्ण भोसले, अशोकराव मंडलिक यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button