अहमदनगर

राहुरी येथे ‘आजचा निश्‍चय पुढच पाऊल’ या पुस्तिकेच्या कव्हर पेजचा प्रकाशन सोहळा संपन्न

राहुरी – अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने काढण्यात येत असलेल्या ‘आजचा निश्‍चय पुढच पाऊल’ या पुस्तिकेच्या कव्हर पेजचा प्रकाशन सोहळा नगर जिल्हा मराठा महासंघाच्या नगर जिल्हा दक्षिण विभागाच्या वतीने राहुरी येथे संत गाडगे बाबा महाराज आश्रम शाळेत जिल्हा पदाधिकार्यांच्या उपस्थित करण्यात आला.

अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांच्या संकल्पनेतून तयार होत असलेल्या “ज्ञानाची आस, गुणवत्तेचा विकास, व्यावसायिकतेचा ध्यास” या अनुषंगाने ‘आजचा निश्‍चय पुढच पाऊल’ ही 74 पानी पुस्तिका प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मराठा समाजाला आज ज्ञान संपत्ती, गुणात्मकतेची व व्यावसायिकतेची मोठी गरज आहे. त्यासाठीची ही जनजागृती मोहीम आहे.

या पुस्तिकेमध्ये ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानातील स्वीकारार्ह बदल, आरक्षण, विवाह सोहळे, कुटुंब संस्था, जमिनीचे रेकार्ड कसे ठेवाल, प्रगत शेती, विधि साक्षरता, अर्थ साक्षरता, नको नुसत्याच चझडउ च्या वाटा, स्मार्ट फोन सोशल मिडियाचा वापर, विविध प्रकारचे शासकीय दाखले, केंद्र व राज्य सरकारच्या व विविध महामंडळांच्या कर्ज योजना, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या शासकीय आणि खाजगी 125 शिष्यवृत्तींची माहिती, प्रक्रिया उद्योग, वसतिगृह, निर्वाह भत्ता, अशी उपयुक्त माहिती या पुस्तिकेत प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

यावेळी शिवाजीराव डौले, रमेश बोरूडे, दिपक तनपुरे, राजेंद्र काळे, दिनकर पवार, योगेश निकम, विलास वराळे, प्रदिप भुजाडी, साळभा नरोडे, अ‍ॅड. प्रविण भिंगारदे, रविंद्र येवले, अ‍ॅड. संदिप भोंगळ, संभाजी शिरसाठ, आत्माराम भोंगळ, नितीन धुमाळ, शुभम वराळे, कुडंलिक भुजाडी, उद्धवराव हारदे, बबनराव भवर, प्रभाकर काळे, बाबासाहेब भवर, रमेश डौले, कुलदिप वराळे, बाबासाहेब डौले आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button