साहित्य व संस्कृती

देशहितवादी ग्रंथाचे प्रकाशन करण्याचा आनंद अद्वितीय स्वरूपाचा – आ. बाळासाहेब थोरात

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : सुखदेव सुकळे यांनी लिहिलेल्या ‘देशहिवादी’ ग्रंथातून स्व.डॉ. अण्णासाहेब शिंदे, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात आणि शिक्षणतपस्वी विधिज्ञ रावसाहेब शिंदे यांच्या समर्पित कार्य, विचारांचा अत्यंत साक्षेपी वेध घेणाऱ्या ‘देशहितवादी’ ग्रंथाचे प्रकाशन करण्याचा आनंद अद्वितीय स्वरूपाचा असल्याचे मत माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

येथील महादेव मळ्यातील विद्यानिकेतन प्री- प्रायमरी इंग्लिश मिडियम स्कूलच्या प्रांगणात आयोजित विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचा सहावा वर्धापन दिन आणि सुखदेव सुकळे लिखित ‘देशहितवादी’ ग्रंथाचे प्रकाशन आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते संपन्न झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे उपकार्याध्यक्ष ॲड. भगीरथ शिंदे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संगमनेरच्या माजी नगराध्यक्षा सौ.दुर्गाताई सुधीर तांबे, मुंबई येथील उद्योजक अनिल अण्णासाहेब शिंदे, छ्त्रपती संभाजीनगरचे उद्योजक रणजित पंडितराव थोरात, ॲड. रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे मुख्य ट्रस्टी डॉ राजीव रावसाहेब शिंदे, नाशिक येथील उद्योजक अभिनव गोडसे आदी उपस्थित होते.

दीप्रज्वलन आणि प्रतिमापूजनाने सोहळ्यास प्रारंभ झाला. विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजीव शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष माजी प्राचार्य टी.ई. शेळके यांनी मान्यवर पाहुण्याचा सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, गुलाबपुष्पे, पुस्तके, शाली देऊन सन्मान केले. सन्मानपत्राचे वाचन प्रतिष्ठानचे समन्वयक, मार्गदर्शक डॉ. बाबुराव उपाध्ये व कोपरगावचे प्रो. डॉ. बाबासाहेब शेंडगे यांनी केले. लेखक सुखदेव सुकळे यांनी पुस्तकाविषयी विवेचन केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले.

आमदार बाळासाहेब थोरात यांनी कृषीसेनानी डॉ.अण्णासाहेब शिंदे, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात आणि शिक्षणतपस्वी ॲड. रावसाहेब शिंदे या तिघांच्या जीवनाचा शोध आणि बोध देणारा ”देशहितवादी” हे समर्पक शीर्षक देऊन अनुभवमय आणि उत्कट भाव शीलतेने ग्रंथ सुखदेव सुकळे यांनी निरपेक्ष जाणिवेतून लिहिला हे विशेष कौतुकास्पद आहे, असे सांगून आमदार थोरात यांनी स्वातंत्र्य पूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील योगदान, शिक्षण, शेती सहकार, कामगार, दुग्धोत्पादन, पाणी पाटबंधारे, पर्यावरण, धरणे, न्याय, कामगार इ. क्षेत्रातील तिघांच्या जीवनाचा साम्यरूपी चरित्रपट विशद केला. डॉ. राजीव शिंदे, डॉ. प्रेरणा शिंदे यांच्या कार्याचे कौतुक केले.

सौ. दुर्गाताई तांबे यांनी अत्यंत भावस्पर्शी जाणिवेने आठवणी सांगितल्या. अनिल शिंदे, अभिनव गोडसे यांनी अनेक दुर्लक्षित आठवणींना उजाळा दिला. अध्यक्षीय भाषणातून ॲड.भगीरथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्यासाठी डॉ. अण्णासाहेब शिंदे, भाऊसाहेब थोरात आणि ॲड.रावसाहेब शिंदे यांच्या मुळा, काकडी इत्यादी धरणाच्या योगदानाचा आढावा घेतला. पाणी आणि शेतीसाठी अण्णासाहेब शिंदे यांचे कार्यअपूर्व आहे. भाऊसाहेब थोरात यांचे योगदान मौलिक आहे. अण्णासाहेब, भाऊसाहेब, रावसाहेब ही त्रिमूर्ती आजच्या युवकांनी समजून घ्यावीअसे आवाहन करून ते म्हणाले, अण्णासाहेब व रावसाहेब हे राम-लक्ष्मण तर होतेच पण त्यापेक्षा रावसाहेब हे मला भरतरुपी समर्पित जाणिवेचे वाटतात हे विशद केले.

या कार्यक्रमास शशिकलाताई शिंदे, सौ. अरुणाताई शिंदे, सौ.जयश्री शेंडगे, दिलीप शिंदे, बाळासाहेब देशमुख, अशोकनाना कानडे, सचिन गुजर, आशिष बोरावके, ज्ञानेश्वर मुरकुटे, पत्रकार प्रकाश कुलथे, ॲड.भागचंद चुडिवाल, माजी सचिव व प्राचार्य शिवाजीराव भोर, डॉ प्रकाश मेहकरकर, प्रा. शिवाजीराव बारगळ, काशिनाथ गोराणे, चंद्रपूरचे नामदेवराव ठाकरे, प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, प्राचार्य डॉ.मुकुंद पोंधे, प्राचार्य डॉ. प्रवीण बडदे, प्राचार्य डॉ. सुहास निंबाळकर, प्राचार्य विनोद रोहमारे, प्राचार्या सौ.रंजना जरे, प्रा.डॉ. भास्कर निफाडे, मुख्याधापक भागचंद औताडे, ग्रंथपाल डॉ.अर्जुन आनंदकर, सुभाष लिंगायत, प्रा. डॉ. शरद दुधाट, चंद्रकांत कोकाटे, सतिश थोरात, रावसाहेब राशिनकर, चित्रा सूरडकर, भीमराज बागूल, विद्यानिकेचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेश बुरकुले, बाळासाहेब बुरकुले, संजय बुरकुले, संकेत बुरकुले, सुयोग बुरकुले, साहेबराव सुकळे आदिंनी नियोजन केले. सूत्रसंचालन डॉ. बाबुराव उपाध्ये, डॉ. बाबासाहेब शेंडगे यांनी केले तर सुदामराव औताडे यांनी आभार मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button