धार्मिक

शिलेगाव येथील श्रीमद् भागवत कथा महायज्ञ व भव्य कीर्तन महोत्सवाचा ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न

राहुरी : तालुक्यातील शिलेगाव येथे १० फेब्रुवारी रोजी सुरू होत असलेल्या श्रीमद् भागवत कथा महायज्ञ व भव्य कीर्तन महोत्सवाचा आज सकाळी ११ वाजता महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज सरला बेट यांच्या हस्ते ध्वजारोहण करून सप्ताहाचा श्री गणेशा करण्यात आला.

शनिवारी दि. १० फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी या सात दिवस चालणाऱ्या भव्य कीर्तन महोत्सवात दैनंदिन कार्यक्रमात दररोज सकाळी ११ ते १ या वेळेत नामवंत महाराजांचे हरी किर्तने होणार आहेत तर दुपारी २ ते ३ या वेळेत प्रवचन होणार आहेत. तसेच सायंकाळी ६ ते ९ या वेळेत श्रीमद् भागवत कथा होणार आहे.

या सप्ताहासाठी दहा एकरावरील क्षेत्रामध्ये भव्य मंडपाची उभारणी करण्यात आली असून येणाऱ्या भाविकांच्या चार चाकी, दुचाकी वाहनांची सुरक्षित व्यवस्था व्हावी म्हणून स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. या सप्ताहाच्या कालावधीत शनिवार दि. १० फेब्रुवारी दुपारी एक ते पाच या वेळेत श्रीमद् भागवत ग्रंथ भव्य मिरवणूक व पूजन करण्यात येणार आहे. सायंकाळी ५ वाजता महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज यांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून या सप्ताहासाठी शिलेगाव व पंचक्रोशीतून येणाऱ्या भाविकांसाठी आमटी भाकर या महाप्रसादाची सकाळ, दुपार व संध्याकाळ पंगत होणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा.

यावेळी पत्रकार अशोक मंडलिक, रमेश खेमनर, राजेंद्र पवार, सोमनाथ वाघ, प्रमोद डफळ, राजेंद्र म्हसे आदींचा सत्कार महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला.

हा सप्ताह यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शिलेगावचे उपसरपंच डॉ. पांडुरंग म्हसे, सुरेशराव म्हसे, बंगाळ साहेब, नितीन म्हसे, अनिल आढाव, उत्तमराव म्हसे, अर्जुन म्हसे, ज्ञानेश्वर म्हसे, सर्जेराव म्हसे, नानासाहेब कोळसे, भगवान म्हसे, गोरक्षनाथ उंडे, बाबासाहेब वने, संतोष देवरे, अशोक देवरे, सदाशिव तागड, पांडुरंग तागड, आदिनाथ वाघ, विजय माळवदे, डॉ. नेमाने, ह.भ.प. मच्छिंद्र महाराज ढोकणे, ह.भ.प. संजय महाराज म्हसे, प्रभाकर म्हसे, कैलास म्हसे, निलेश म्हसे, दिपक म्हसे, बाळासाहेब म्हसे, रवींद्र म्हसे, दादा म्हसे, संजय देवरे आदींसह ग्रामस्थ परिश्रम घेत आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button