रविवारी आ. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सुखदेव सुकळे लिखित “देशहितवादी” पुस्तकाचे प्रकाशन
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : येथील विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचा सहावा वर्धापन दिन आणि प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांनी लिहिलेल्या “देशहितवादी” पुस्तकाचे प्रकाशन माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत रविवार दि.०४ फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
श्रीरामपूर येथील महादेव मळा येथील ॲड. रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन प्री प्रायमरी इंग्लिश मिडियम स्कूलच्या प्रांगणात आयोजित सोहळ्यात कृषी क्रांतीचे जनक डॉ. अण्णासाहेब शिंदे, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात, शिक्षणतपस्वी ॲड. रावसाहेब शिंदे यांच्या चरित्रचिंतनात्मक ‘देशहितवादी’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवार दि.४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. रयत शिक्षण संस्थेचे उपकार्याध्यक्ष ॲड. भगिरथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या ‘देशहितवादी’ पुस्तकाचे प्रकाशन आ. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होत आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे मुंबई येथील उद्योजक अनिल अण्णासाहेब शिंदे, छत्रपती संभाजीनगरचे उद्योजक रणजित थोरात, संगमनेर येथील नगराध्यक्षा दुर्गाताई सुधीर तांबे, ॲड. रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे मुख्य ट्रस्टी व विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजीव रावसाहेब शिंदे आदी उपस्थित राहणार आहेत. प्रतिष्ठानचा ६ वा वर्धापन दिन व पुस्तक प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे, कार्याध्यक्ष माजी प्राचार्य टी.ई. शेळके, समन्वयक, मार्गदर्शक डॉ. बाबुराव उपाध्ये, कोषाध्यक्ष सुयोग बुरकुले यांनी केले आहे.