साहित्य व संस्कृती

डॉ. रामकृष्ण जगताप यांच्या ‘अंतर्मन बोले तथास्तु’ पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न

पवित्र लग्नप्रसंगी "अंतर्मन बोले तथास्तू" पुस्तकाचा रंगला पुस्तक सोहळा

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : येथील साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष व संमोहमनतज्ज्ञ सायकॉलॉजिस्ट डॉ. रामकृष्ण सोन्याबापू जगताप यांच्या ‘अंतर्मन बोले तथास्तू’ पुस्तकाचे प्रकाशन साहित्यिक आमदार लहू कानडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, मराठी विभाग प्रमुख प्रो.डॉ. ह.भ.प.वसंत शेंडगे महाराज आणि मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.

डॉ. रामकृष्ण जगताप यांचे चिरंजीव सूरज आणि प्रहार संघटनेचे धरणग्रस्त व प्रकल्पग्रस्त कृती समितीचे जिल्हाध्यक्ष कृष्णा सातपुते यांची कन्या स्नेहल यांच्या विवाहप्रसंगी वाचन संस्कृतीला चालना मिळावी यासाठी हे प्रकाशन महत्त्वाचे ठरले. एक हजार पुस्तके या निमित्ताने वाचकांना देण्यात आली. या प्रसंगी कृष्णा सातपुते यांनी मान्यवराचा शाल, बुके, फेटे बांधून स्वागत व सत्कार केले. डॉ. राज यांनी पुस्तकाचे महत्त्व सांगितले.

डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी डॉ. रामकृष्ण जगताप यांनी संमोहन विषयातील पीएच.डी. आणि पुस्तकातील मानसशास्त्रीय आरोग्य महत्व व मानसिक ताणतणाव घालविण्यासाठी पुस्तक महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. आमदार लहू कानडे यांनी पुस्तकाचे प्रकाशन झाल्याचे आणि जीवनपूरक लेखनाचे महत्त्व सांगून विवाह सारख्या पवित्र प्रसंगी अशा पुस्तकाचे प्रकाशन केले त्याबद्दल समाधान व्यक्त केले.

माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी जगताप आणि सातपुते परिवाराचे कौतुक करून ‘तथास्तू’ हजारो लोकांना पुस्तक भेट दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ह.भ.प. डॉ. वसंत शेंडगे महाराज यांनी डॉ.रामकृष्ण जगताप यांनी लिहिलेले “तथास्तू” पुस्तक दररोज नियमित वाचल्यास समाधान मिळेल, ताणतणाव मुक्त जीवन जगण्याचा मूलमंत्र असलेले हे पुस्तक म्हणजे जीवन संजीवनी असल्याचे मत व्यक्त केले. प्रहार संघटनेचे धरणग्रस्त व प्रकल्पग्रस्तचे जिल्हाध्यक्ष कृष्णा सातपुते यांनी साहित्यिकांचा, मान्यवरांचा सत्कार केला.

यावेळी माजी आ. बाळासाहेब मुरकुटे, माजी आ. चंद्रशेखर घुले, जि.प. अध्यक्षा राजश्रीताई घुले, वृध्देश्वर स.सा. कारखाना चेअरमन प्रतापकाका ढाकणे, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे, जिल्हा संघटक ज्ञानेश्वर सांगळे, वंचित बहुजन आघाडी राज्य उपाध्यक्ष साहित्यिक किसन चव्हाण, जिल्हा संघटक बाळासाहेब खर्जुले, मिडिया जिल्हा प्रमुख संजय वाघ यांनी सोहळ्याचे कौतुक केले.

श्रीमती विमल सातपुते, सौ. रोहिणी सातपुते, वैभव सातपुते, प्रतीक सातपुते, गोरक्ष सातपुते, पत्रकार बाबासाहेब चेडे, साहित्यिक डॉ. शिवाजी काळे, डॉ. मनोजकुमार थोरात, प्रा.पोपटराव पटारे, स्वामीराज कुलथे, चेअरमन रामेश्वर चोपडे, संचालक सरोदे, चंद्रकांत मोरे, राजेश बनकर, भाऊसाहेब घुले, शिवाजी घुले, विराज भोसले, राजेंद्र ओहोळ, इंजिनिअर सूरज जगताप, सौ. स्नेहल जगताप, कु.डॉ.भक्ती जगताप, सौ. उज्वला जगताप, सौ. मंदाकिनी उपाध्ये, सौ.सुनीता पटारे, सौ मोहिनी काळे, पटारे, कु. सुकन्या काळे, सुयश काळे, हेमंत पटारे, गणेशानंद उपाध्ये, सौ.आरती उपाध्ये, निर्मिक उपाध्ये, ग्रंथा उपाध्ये, कु.श्रेयल पटारे आदिंनी पुस्तकाचे आणि आगळ्या वेगळ्या उपक्रमाविषयी आनंद व्यक्त केला. डॉ.रामकृष्ण जगताप यांनी सर्वांचे आभार मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button