राजकीय

भाजपच्या नूतन कार्यकारिणीला भिंगारदे, म्हसे यांच्या समावेशाने बळकटी

राहुरी : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली व खा. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष सुरेश बानकर यांनी नुकतीच राहुरी तालुका कार्यकारिणी जाहीर केली असून या जंबो कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर भिंगारदे, डॉक्टर्स सेल अध्यक्षपदी डॉ. पांडुरंग म्हसे, तर चिटणीस पदी रमेश पाटीलबा म्हसे यांच्या निवडीने बळकटी मिळाली आहे.

डिग्रस येथील ज्ञानेश्वर भिंगारदे हे डिग्रस ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा सोसायटीचे विद्यमान सदस्य आहेत. त्यांनी शेतकरीहित डोळ्यासमोर ठेवून क्रांतीसेनेच्या वतीने विविध प्रश्नांवर सरकारसमोर मांडण्यात आलेल्या मागण्यांसंदर्भात सक्रिय सहभाग नोंदविला आहे. त्याचप्रमाणे शिलेगाव येथील डॉ. पांडुरंग म्हसे हे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच असून शिलेगाव सोसायटीचे सदस्यही आहेत. तसेच येथील रमेश पाटीलबा म्हसे यांनीही छावा संघटनेच्या माध्यमातून विविध प्रश्नांवर आवाज उठवला आहे.

या तिघांचाही तालुक्यात विविध माध्यमांतून मोठा जनसंपर्क असून आपआपल्या परिसरातील सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांची त्यांनी सोडवणूक केल्याने जंबो कार्यकारिणीतील त्यांच्या समावेशाने तालुकाध्यक्ष सुरेश बानकर यांनी जाहीर केलेल्या राहुरी तालुका कार्यकारिणीला बळकटी मिळाली आहे. या निवडीबद्दल ज्ञानेश्वर भिंगारदे, उपसरपंच डॉ. पांडुरंग म्हसे, रमेश म्हसे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button